ETV Bharat / sitara

Video : नववधू दिशा परमारने ओलांडला मराठमोळ्या घराचा उंबरा, कुटुंबियांच्या उंचावल्या नजरा - राष्ट्रीय टीव्ही चॅनलवर राहुलने दिशाला केले होते प्रपोज

नवविवाहित जोडपे राहुल वैद्य आणि दिशा परमार यांच्या विवाहोत्तर बातम्याही चर्चेत आहेत. वैद्यांच्या घरी दिशा परमारने टाकलेले पहिले पाऊल, माप ओलांडून झालेला गृहप्रवेश सध्या चर्चेत आहे. राहुल वैद्यने आपल्या इन्स्टाग्रामवर दिशाच्या गृहप्रवेशाचा व्हिडिओ पोस्ट केला आहे.

Bride Disha enters Rahul Vaidya's house
दिशाने ओलांडला वैद्यांचा उंबरा
author img

By

Published : Jul 20, 2021, 3:44 PM IST

Updated : Jul 20, 2021, 3:58 PM IST

मुंबई - बिग बॉस मुळे अल्पावधीतच प्रसिध्द झालेला गायक राहुल वैद्य (Rahul vaidya) आणि त्याची प्रेयसी दिशा परमार (Disha parmar) 16 जुलै रोजी लग्नबंधनात अडकले होते. त्यानंतर सोशल मीडियावर त्यांच्या प्रेमप्रकरणापासून ते लग्नापर्यंतची सवंग चर्चा रंगली होती. त्यांचे विवाहाचे फोटो हा चर्चेचा विषय ठरला होता. आता राहुलने दिशाच्या गृहप्रवेशाचा एक व्हिडिओ शेअर केलाय.

पारंपरिक पध्दतीने माप ओलांडून दिशाचा गृहप्रवेश

या व्हिडिओमध्ये नववधू दिशा आणि राहुल वैद्यांच्या घरी आलेले दिसतात. दरवाजावर माप ओलंडण्याचा पारंपरिक कार्यक्रम यात दिसतो. नव्या घराचा उंबरा ओलांडून दिशा घरात प्रवेश करण्यासाठी सज्ज झालेली दिसते. नवरा नवरीच्या स्वागतासाठी वैद्या कुटुंबीय सज्ज झालेले दिसते. अखेर दिशा आणि राहुलचे औक्षण केले जाते आणि दिशा माप ओलांडून गृहप्रवेश करते. दोघांच्यावर गुलाबाच्या पाकळ्या उधळल्या जातात. दिशाचे पहिले पाऊल घरात पडते त्याचा आनंद सर्वजण व्यक्त करतात.

हा व्हिडिओ राहुल वैद्यने इन्स्टाग्रामवर शेअर केलाय. त्याच्या कॅप्शनमध्ये राहुलने लिहिलंय, "जेव्हा माझे कुटुंबीय माझ्या राणीचे तिच्या नव्या घरात स्वागत करतात. अजूनही या जागात भरपूर प्रेम आणि विश्वास शिल्लक आहे."

ग्रँड हयातमध्ये रंगला विवाहसोहळा

16 जुलै रोजी दिशा आणि राहुलचा लग्न सोहळा मुंबईच्या ग्रँड हयातमध्ये पार पडला. यावेळी राहुलने हस्त दंती रंगाचा शेरवानी परिधान केला होता तर दिशा वधूच्या लाल रंगाच्या वेशात खूपच सुंदर दिसत होती. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मोजक्या पाहुण्यांच्या उपस्थित हा लग्नसोहळा पार पडला.

राष्ट्रीय टीव्ही चॅनलवर राहुलने दिशाला केले होते प्रपोज

राहुल आणि दिशा काही काळापासून रिलेशनमध्ये आहेत. बिग बॉस 14 मध्ये सर्वात पहिल्यांदा राहुलने दिशाबद्दलची आपली भावना व्यक्त केली होती. त्याने राष्ट्रीय टीव्ही वाहिनीवर दिशाला प्रपोज केले होते. यावर दिशा परमारने देखील तिचा होकार दिला होता. राहुलने दिशाच्या वाढदिवसाच्या दिवशी एका पांढऱ्या रंगाच्या टीशर्टवर लिपस्टिकने ‘माझ्याशी लग्न करशील का’ असं लिहित टेलिव्हिजनवरून प्रपोज केलं होतं. त्यानंतर व्हॅलेंटाइन्स डेला शोमध्ये येऊन दिशाने राहुलच्या प्रपोजला होकार दिला होता.

हेही वाचा - अश्लील चित्रफीत प्रकरणी अटकेनंतर कुंद्राच्या 'या' व्हिडिओची सोशल मीडियावर चर्चा

Last Updated : Jul 20, 2021, 3:58 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.