मुंबई - निर्माता बोनी कपूर यांच्या घरी काम करणारी एक व्यक्ती कोरोनाच्या संक्रमणाचा शिकार झाला आहे. त्याला क्वारंटाईन सेंटरमध्ये नेण्याची प्रक्रिया सुरू झाल्याचे बोनी कपूर यांनी सांगितले.
बोनी कपूर यांनी एका निवेदनात म्हटले आहे की, ''मी, माझी मुले आणि इतर कर्मचारी ठीक आहोत. आमच्या कुणामध्येही कोरोनाची लक्षणे आढळलेली नाहीत. लॉकडाऊन सुरू झाल्यानंतर आम्ही कोणीही घर सोडलेले नाही. आम्हाला केलेल्या तातडीच्या मदतीबद्दल महाराष्ट्र सरकार आणि मुंबई महानगरपालिकेचे आम्ही आभारी आहोत.''
''महापालिका आणि मेडिकल टीमने दिलेल्या सर्व सूचनांचे आम्ही पालन करू. आम्हाला खात्री आहे की चरण (कर्मचारी) लवकरच ठीक होईल आणि पुन्हा एकदा आमच्या घरी परतेल,'' असेही त्यांनी या निवेदनात नमूद केले आहे.
चरण साहू (23) हा बोनी कपूर यांच्या लोखंडवाला कॉम्प्लेक्समधील घरी राहतो. चरण शनिवारपासून आजारी होता. बोनी कपूरने त्याला कोरोना चाचणीसाठी पाठवले असता तो पॉझिटिव्ह निघाला.