ETV Bharat / sitara

क्रिकेटवरील चित्रपटांसाठी बॉलिवूडची जोरदार बॅटींग - world cup

८३ चित्रपटासोबतच आणखी दोन क्रिकेटवर आधारित चित्रपट बॉलिवूडमध्ये बनणार आहेत. डियर कॉम्रेड आणि जर्सी हे दोन तेलुगु चित्रपटांचा हिंदीत रिमेक होणार असून हे चित्रपट क्रिकेटवर आधारित आहेत.

क्रिकेटवर आधारित चित्रपट
author img

By

Published : Aug 12, 2019, 1:30 PM IST

दिग्दर्शक कबीर खानने १९८३ मध्ये भारतीय क्रिकेट संघाने विश्वचषक जिंकला त्याचा थरार '८३' या चित्रपटातून दाखवणार आहे. क्रिकेटवर अजून दोन हिंदी चित्रपट बनणार आहेत. 'जर्सी' आणि 'डियर कॉम्रेड' या दोन तेलुगु चित्रपटांचे हिंदी रिमेक होणार असून हे दोन्ही चित्रपट क्रिकेटवर आधारित आहेत.

करण जोहरने 'डियर कॉम्रेड' या तेलुगु चित्रपटाचा हिंदीत रिमेक करायचे ठरवले आहे. हा चित्रपट सुपरहिट कॅटॅगिरीतील नाही. त्यामुळे करणला यात बरेच बदल करावे लागणार आहेत. हा एक प्रेमकथा असलेला चित्रपट आहे. राज्य स्तरावर क्रिकेट खेळणाऱ्या मुलीची आणि विद्यार्थी नेत्याची ही प्रेमकथा आहे. तेलुगुमध्ये विजय देवरकोंडाने या चित्रपटात मुख्य भूमिका साकारली आहे. त्यानेच हिंदीतही काम करावे अशी करणची अपेक्षा आहे. मात्र अलिकडेच विजयने हिंदीत काम करणार नसल्याचे सांगितले होते. त्यामुळे ही भूमिका कोण करणार याचीही उत्कंठा आहे.

'जर्सी' या चित्रपटाची कथादेखील क्रिकेटची पार्श्वभूमी असलेली आहे. आपल्या मुलाने भारतीय संघाची जर्सी घालावी यासाठी जिवाचे रान करणाऱ्या वडिलाची ही गोष्ट आहे. जर्सी हा चित्रपट 'गजनी' चित्रपटाचे निर्माता अलू अरविंद, अमन गिल आणि दिल राजू यांनी निर्माण केलाय. आता हा चित्रपट हिंदीत बनत असून शाहिद कपूरला या चित्रपटासाठी संपर्क केला जाणार असल्याचे समजते.

भारतीय क्रिकेट संघाने १९८३ मध्ये इंग्लंडमध्ये विश्वचषक जिंकला होता. यावर आधारीत '८३' हा चित्रपट सध्या बनतोय. या पार्श्वभूमीवर 'जर्सी' आणि 'डियर कॉम्रेड' हे आणखी दोन क्रिकेटच्या पार्श्वभूमीवर बनणार आहेत. भारतात क्रिकेट हा खेळ सर्वाधिक लोकप्रिय आहे. त्यामुळे क्रिकेट चाहत्यांना ही नवी पर्वणीच बॉलिवूड देणार आहे.

Intro:Body:Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.