ETV Bharat / sitara

'बोले चूडिया'चा टीजर प्रदर्शित...पाहा नवाजुद्दीनचा रोमँटीक अंदाज..

आत्तापर्यंत आपण नवाजुद्दीन सिद्दीकीला मारामारी करताना पाहिले आहे. मात्र, यंदा पहिल्यांदाच नवाजुद्दीन एका प्रियकराच्या भुमिकेत आपल्याला दिसणार आहे.

बोले चूडिया
author img

By

Published : Sep 26, 2019, 6:50 PM IST

मुंबई - हिंदी अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकीचा आगामी चित्रपट 'बोले चूडिया'चा टीजर नुकताच प्रदर्शित झाला. या चित्रपटात नवाजुद्दीन सोबत अभिनेत्री तमन्ना भाटियाही मुख्य भुमिकेत झळकणार आहे.

आत्तापर्यंत आपण नवाजुद्दीन सिद्दीकीला मारामारी करताना पाहिले आहे. मात्र, यंदा पहिल्यांदाच नवाजुद्दीन एका प्रियकराच्या भुमिकेत आपल्याला दिसणार आहे. नवाजुद्दीनने आपल्या ट्विटर आकाऊंटवर या चित्रपटाचा टीजर शेअर केला आहे. सोबतच 'अब अपून को लाइफ में कोई लफड़ा नहीं चाहिए. बस रोमांस और फैमिली... #बोले चूडियां की पहली झलक' असे कॅपशनही दिले आहे.

या चित्रपटाचे दिग्दर्शन नवाजुद्दीनचा भाऊ शम्स नबाब सिद्दीकीने केले आहे. दिग्दर्शक म्हणून त्यांचा हा पहिलाच चित्रपट आहे. तर राजेश भाटिया आणि किरण जवेरी भाटिया हे या चित्रपटाचे निर्माते आहेत. या चित्रपटाचे अधिकतर चित्रिकरण राजस्थानमध्ये करण्यात आले आहे. या चित्रपटात आगोदर 'नागिन' फेम मोनी राय मुख्य भुमिका साकारणार होती. मात्र, शेवटी तमन्नाला हे पात्र साकारण्यासाठी देण्यात आले.

Intro:Body:Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.