ETV Bharat / sitara

बर्थडे स्पेशल: नसीरुद्दीन शहा यांच्या जबरदस्त अभिनय प्रवासाची झलक पहा

अनुभवी अभिनेता नसीरुद्दीन शहा आज आपला 70 वा वाढदिवस साजरा करीत आहेत. एक उत्तम अभिनेता असण्याबरोबरच दूरदर्शन, थिएटर आणि मोशन पिक्चर्स मधील त्यांचे योगदान उल्लेखनीय आहे. त्यांच्या या खास वाढदिवसानिमित्य कला क्षेत्रातील त्यांच्या प्रवासावर नजर टाकूयात.

Naseeruddin Shah's stupendous journey
Naseeruddin Shah's stupendous journey
author img

By

Published : Jul 20, 2020, 1:10 PM IST

मुंबई - बॉलिवूडमधील ज्येष्ठ अभिनेता नसीरुद्दीन शाह यांचा आज ७० वा वाढदिवस आहे. ते भारतातील सर्वोत्कृष्ट कलाकारांपैकी एक मानले जातात आणि ते भारतीय समांतर सिनेमातील एक प्रमुख व्यक्तिमत्त्व आहेत. मुख्य प्रवाहातील चित्रपट तसेच आर्ट फिल्ममध्ये या दोन्ही मुख्य प्रवाहातही ते यशस्वी आहे.

Naseeruddin Shah's stupendous journey
नसीरुद्दीन शहा बर्थडे स्पेशल

उत्तर प्रदेशमधील बाराबंकी शहरात जन्मलेल्या नसीरुद्दीन यांनी १९७५ मध्ये श्याम बेनेगलच्या निशांत चित्रपटांतून हिंदी सिनेसृष्टीत पदार्पण केले होते. भारतीय चित्रपटसृष्टीतील योगदानाबद्दल भारत सरकारने त्यांना पद्मश्री आणि पद्मभूषणने सन्मानित केले आहे.

Naseeruddin Shah's stupendous journey
नसीरुद्दीन शहा बर्थडे स्पेशल

अष्टपैलू अभिनेत्याने १९७९ मध्ये 'स्पर्श' चित्रपटातील अंध व्यक्तीच्या भूमिकेसाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारही जिंकला आहे. नसीरुद्दीन १९८० मध्ये हम पांच या चित्रपटाद्वारे मुख्य प्रवाहातील चित्रपटात सक्रिय झाले होते.

गौतम घोसे यांच्या पार (१९८४) चित्रपटासाठी व्हेनिस फिल्म फेस्टिव्हलमध्ये त्यांनी व्होल्पी चषक जिंकला होता. त्यांना मासूम, बाजार, आक्रोश, चक्र, स्पर्श, ए वेन्सडे या चित्रपटासाठी फिल्मफेअरचा सर्वोत्कृष्ट अभिनेता पुरस्कार मिळाला होता. चित्रपटांमधील आपल्या खलनायकी भूमिकांमुळे प्रेक्षकांना प्रभावित करणाऱ्या नसीरुद्दीन यांना मोहरा, चाहत, सरफरोश, क्रिश या चित्रपटाचा सर्वोत्कृष्ट खलनायक पुरस्कार मिळाला.

Naseeruddin Shah's stupendous journey
नसीरुद्दीन शहा बर्थडे स्पेशल

नसीरुद्दीन यांनी दूरदर्शन उद्योगातही काम केले आहे. कवी गुलजार यांनी लिहिलेल्या व निर्मित टीव्ही मालिका मिर्झा गालिब मधील त्यांची कामगिरी आजही त्यांचा उल्लेखनीय म्हणून आठवली जाते. 'द मराठा किंग शिवाजी', 'तार्काश' या 'टेलिव्हिजन' मालिकेमध्ये त्यांनी भूमिका केल्या.

Naseeruddin Shah's stupendous journey
नसीरुद्दीन शहा बर्थडे स्पेशल

अभिनेता म्हणून त्यांच्या भूमिकेशिवाय त्यांनी दिग्दर्शकाच्या भूमिकेतही काम केले. २००६ मध्ये त्यांचे दिग्दर्शन असलेला 'यूँ होता तो क्या होता' हा चित्रपट प्रदर्शित झाला. यात कोंकणा सेन शर्मा, परेश रावल, इरफान खान, तत्कालीन नवोदित आयशा टाकिया, त्यांचा मुलगा इमाद शाह आणि त्यांचा जुना मित्र रवी बसवानी अशा अनेक प्रस्थापित कलाकारांनी काम केले होते.

Naseeruddin Shah's stupendous journey
नसीरुद्दीन शहा बर्थडे स्पेशल

हेही वाचा -मै हूँ उनके साथ..! अमिताभ यांनी आरोग्य कर्मचाऱ्यांसाठी शेअर केली बाबूजींची कविता

चित्रपट आणि टीव्ही शोमध्ये त्यांनी कारकिर्द गाजवली असली तरी नाट्यक्षेत्रातील त्यांची कारकिर्द भव्य आहे. आपल्या अभिनय कौशल्याने त्यांनी अनेक नाटके गाजवली. टॉम ऑल्टर आणि बेंजामिन गिलानी यांच्यासमवेत त्यांनी मोटले प्रॉडक्शन नावाचा एक थिएटर ग्रुप देखील स्थापित केला. त्यांच्या नाट्यविषयक कामामध्ये सॅम्युएल बेकेटच्या वेटिंग फॉर गोडोट, महात्मा वि. गांधी, डियर लियर, आइन्स्टाईन आणि वॉक इन वुड्स या नाटकांचा समावेश होतो.

Naseeruddin Shah's stupendous journey
नसीरुद्दीन शहा बर्थडे स्पेशल

त्यांनी मॉन्सून वेडिंग (२००१), द लीग ऑफ एक्स्ट्राऑर्डिनरी जेंटलमेन (२००३) आणि टुडेज स्पेशल (२००९) यासारख्या आंतरराष्ट्रीय नाटकांमध्येही भूमिका साकारल्या. नसीरुद्दीन शाह यांनी परफॉर्मिंग आर्ट क्षेत्रात अतुलनीय योगदान देऊन प्रेक्षकांना वारंवार आश्चर्यचकित केले आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.