ETV Bharat / sitara

Birthday Special: 'मान्सून वेडिंग' ते हॉलिवूडचा 'एक्स्ट्रेक्शन' पर्यंतचा रणदीपचा प्रवास... - एक्स्ट्रेक्शन' पर्यंतचा रणदीपचा प्रवास...

'सुल्तान'चा प्रशिक्षक असो, किंवा 'बागी 2' चा पोलीस असो रणदीप हूडा पडद्यावर उतरवतो ते पात्र त्याचे स्वतःचे असते. हरियाणातील या रणदीपला त्याचे वडिल डॉक्टर बनवू पाहात होते, परंतु त्याच्या नशिबात काही वेगळेच लिहिले होते. रणदीप हुडाने बॉलिवूडमध्ये फक्त २९ चित्रपट केले आहेत, पण त्याची प्रत्येक व्यक्तिरेखा आपल्या हृदयात स्थिर झाली आहे.

Birthday Special
रणदीपचा प्रवास...
author img

By

Published : Aug 20, 2020, 7:09 PM IST

मुंबई : 'वन्स अपॉन ए टाइम इन मुंबई', 'साहब बीवी और गॅंगस्टर', 'जिस्म 2', 'मर्डर 3', 'हायवे', 'किक', 'रंग रसिया', 'लाल रंग', 'सरबजित', 'सुलतान' आणि 'बागी 2' सारख्या चित्रपटांमध्ये झळकलेला बॉलिवूड अभिनेता रणदीप हूडा आज आपला 44 वा वाढदिवस साजरा करीत आहे. २००१ साली त्यांनी 'मान्सून वेडिंग' चित्रपटाद्वारे आपल्या फिल्मी करिअरची सुरुवात केली. आज रणदीप बॉलीवूडमधील नामांकित कलाकारांपैकी एक आहे.

२० ऑगस्ट १९७६ रोजी हरियाणाच्या रोहतक जिल्ह्यात रणदीपचा जन्म झाला. त्याचे वडिल डॉक्टर आणि आई सामाजिक कार्यकत्या आहेत.

Birthday Special
फॅशनशोमध्ये रणदीप

अभिनेता रणदीप हूडा रणदीपने आपल्या फिल्मी करिअरची सुरुवात तारुण्याच्या काळात मित्रांसमवेत 'मॉन्सून वेडिंग' या चित्रपटाद्वारे केली होती. २००१ मध्ये नसीरुद्दीन शाह यांच्या 'द प्ले टू टीच हीज ओन' या नाटकाच्या तालीमच्या वेळी त्याने चित्रपट दिग्दर्शिका मीरा नायर यांची भेट घेतली आणि रणदीपला त्यांच्या 'मॉन्सून वेडिंग' चित्रपटासाठी ऑडिशन देण्यास सांगितले. ज्यामध्ये तो निवडला गेला.

रणदीप हूडा आजपर्यंत 'मानसून वेडिंग' चित्रपटानंतर 'रिस्क', 'डरना जरूरी है', 'वन्स अपॉन अ टाइम इन मुंबई', 'साहिब बीवी और गैंगस्टर', 'जिस्म 2', 'मर्डर 3', 'हाइवे', 'किक', 'रंग रसिया', 'लाल रंग', 'सरबजीत', 'सुल्तान' और 'बागी 2' यासारख्या चित्रपटातून झळकला आहे.

Birthday Special
'सरबजित'मध्ये रणदीप
Birthday Special
'वन्स अपॉन अ टाइम इन मुंबई' मधील एका सीनमध्ये रणदीप

रणदीपला 'हायवे' चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्यासाठी स्टार डस्ट अवॉर्ड देण्यात आला. २०१५ मध्ये पहिल्यांदा 'रंगरसिया' चित्रपटासाठी फिल्मफेअर पुरस्कारासाठीदेखील नामांकित झाले होते. या चित्रपटांमध्ये 'मैं और चार्ल्स', 'सरबजीत' आणि 'रंगरसिया' यांचा समावेश आहे.

हेही वाचा - सुशांतच्या मृतदेहाचे पोस्टमॉर्टम करणार्‍या डॉक्टरांना येत आहेत धमकीचे फोन

रणदीपने मेलबर्न येथून मार्केटिंग विषयात पदवी संपादन केली असून त्यानंतर तेथून त्याने बिजनेस मॅनेजमेंट आणि ह्यूमन रिसोर्स मॅनेजमेंट पदव्युत्तर पदवी संपादन केली आहे. यावेळी त्याने एका चिनी रेस्टॉरंटमध्ये वेटर, टॅक्सी ड्रायव्हर, कार वॉशर आणि लाइफ गार्ड अशी कामे केली आहेत.

रणदीप एक चांगला अभिनेता असण्याबरोबरच एक चांगला घोडेस्वार आहे. रणदीपला हॉर्स रायडिंग, शो जंपिंग यासारखे खेळ खेळायला खूप आवडते. हूडा हा एकमेव बॉलीवूड अभिनेता आहे जो नियमितपणे पोलो आणि शो जम्पिंगसह व्यावसायिक इक्वेस्टेरियन खेळांमध्ये भाग घेतो.

Birthday Special
घोडेस्वारी करताना रणदीप

रणदीपला अखेर हॉलिवूड चित्रपट 'एक्सट्रॅक्शन' मध्ये पाहिले गेले होते. त्यांच्या या चित्रपटातील भूमिकेचे खूप कौतुक झाले. सलमानच्या 'राधे' या आगामी चित्रपटात रणदीप दिसणार आहे. 'ईटीव्ही भारत'तर्फे रणदीपला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.