मुंबई - राज कपूर यांच्या बॉबी चित्रपटातून डिंपल कपाडियाने पदार्पण तर केलेच पण प्रचंड लोकप्रियताही मिळवली. त्यानंतर त्याच वर्षी तिने सुपरस्टार राजेश खन्नाशी लग्न केले आणि अभिनयातून संन्यास घेतला. 1984 मध्ये डिंपल कापडिया आणि राजेश खन्ना विभक्त झाल्यानंतर ती चित्रपटांमध्ये परतली. त्यानंतर ती सागर, काश, दृष्टि, लेकिन ... आणि रुदाली अशा चित्रपटांमध्ये दिसली होती.
तिच्या परत आल्याच्या सर्व चित्रपटांपैकी कल्पना लाजमीच्या 'रुदाली'ने डिंपलच्या कारकीर्दीत महत्त्वपूर्ण स्थान राखले आहे. कपाडियाने शनिचरीची एक मुख्य भूमिका साकारली होती. एकाकी आणि कठोर स्त्रीची, जी दुर्दैवाने आयुष्यभर कधीही रडत नव्हती अशी ही वेगळी भूमिका होती. रुदालीतील उत्स्फूर्त अभिनयासाठी या अभिनेत्रीला सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार मिळाला.
दिल चाहता है या चित्रपटात तिने किरकोळ भूमिका निभावली होती आणि एका मध्यमवयीन, घटस्फोटीत मद्यपी स्त्रीच्या भूमिकेसाठी तिने अपार मेहनत घेतली. या चित्रपटात, डिंपल तिच्या प्रेम धरम सह-अभिनेता विनोद खन्नाचा मुलगा अक्षय खन्नावर रोमांस करताना दिसली होती आणि त्यांचा ट्रॅक सर्वात जास्त चर्चेत आला होता कारण 2000 च्या सुरुवातीच्या काळात वयस्क महिला-तरूण पुरुषाचा प्रणय अद्याप निषिद्ध होता.
डिंपलने लीला या चित्रपटात अत्यंत नेटकी भूमिका साकारली. एक स्त्री म्हणून स्वतःला शोधणारी भूमिका तिने लीलया पेलली होती. दिल चाहता है, च्या यशानंतर डिंपल लक बाय चान्स, व्हॉट द फिश आणि फाइन्डिंग फॅनी यासारख्या ऑफबीट चित्रपटांचा भाग बनली. तिने दबंग, पटियाला हाऊस आणि वेलकम बॅक या व्यावसायिक चित्रपटातही काम केले. यात तिने भूमिका कितीही छोटी असली तरी तिच्याकडे दुर्लक्ष केले.
"मी कधीच 'मिल्स अँड बून' प्रकारची व्यक्ती नव्हते. मी कधीही शिफॉन आणि सॅटीन व्यक्ती नव्हते. मी नेहमीच एक साधी सूती व्यक्ती आहे. मी फक्त असाच प्रकार आहे, असे मत डिंपल कपाडिया यांनी एकदा तिच्या चित्रपटांच्या असामान्य निवडीबद्दल व्यक्त केले होते.
तिचा आवडता दिग्दर्शक होमी अदजानियाच्या अंग्रेजी मीडियममध्ये अलिकडेच तिने काम केले होते. ती आगामी काळात हॉलिवूडच्या मोगल क्रिस्टोफर नोलनच्या ‘टेनेट’ या चित्रपटात दिसणार आहे. १९७३ पासून शोबिजचा भाग असलेल्या डिंपल कपाडियाला सुरुवातीला हॉलिवूडची ही भूमिका साकारण्यास संकोच वाटला असला तिने कास्टिंग टीमला बरेच प्रभावित केले. विशेष म्हणजे नोलन यांना तिला भेटण्यासाठी लॉस एंजेलिसहून मुंबईला यावे लागले होते.
‘टेनेट’ नंतर डिंपल अयान मुखर्जीच्या महत्वाकांक्षी ब्रह्मास्त्र: भाग एक या चित्रपटात दिसणार आहे. हा चित्रपट हिंदी, तमिळ, तेलगू, कन्नड आणि मल्याळम या पाच भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे.