मुंबई - बहुचर्चित 'बिग बॉस 15' च्या सिझनची विजेती घोषित झाली ( Bigg Boss 15 Winner ) आहे. अभिनेत्री तेजस्वी प्रकाशने यंदाच्या जेतेपदाची ट्रॉफी आपल्या नावावर केली ( Bigg Boss Winner Tejaswi Prakash ) आहे. तेजस्वी प्रकाश आणि प्रतिक सहजपाल या दोघांमध्ये जेतेपदाची लढाई झाली. अखेरच्या क्षणाला अभिनेता सलमान खानने ( Actor Salman Khan ) तेजस्वी प्रकाश ( Bigg Boss Winner Tejaswi Prakash ) हिचे नाव जाहीर केलं आणि एकच जल्लोष पाहायला मिळाला.
'बिग बॉस 15' ची विजेती तेजस्वी प्रकाशला 40 लाखांचा चेक आणि ट्रॉफी मिळाली आहे. करण कुंद्रा, प्रतिक सहजपाल, तेजस्वी प्रकाश, शमिता शेट्टी आणि निशांत भट्ट या पाच फायनलिस्टमध्ये 'बिग बॉस 15' च्या ट्रॉफीसाठी मोठी चुरस पाहायला मिळाली. निशांत भट्ट आणि शमिता शेट्टी दोघे शेवटच्या क्षणी बाद झाल्यानंतर प्रतिक सहजपाल, करण कुंद्रा आणि तेजस्वी प्रकाश रेसमध्ये राहिले.
त्यानंतर करण कुंद्राही बाद झाला आणि तेजस्वी व प्रतिक यांच्यात 'बिग बॉस 15' चा विजेता कोण होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. तेव्हा सलमान खानने तेजस्वी प्रकाशच्या नावाची घोषणा केली. तेजस्वीला 'बिग बॉस'ची ट्रॉफी आणि 40 लाखांचा चेक सोपावण्यात आला. 'बिग बॉस 15' च्या या ग्रँड फिनालेला मनोरंजन क्षेत्रातील दिग्गजांनी उपस्थिती लावली होती.
तेजस्वी प्रकाश बनणार नागिन
'बिग बॉस 15'ची विजेती घोषित केल्यानंतर 'नागिन 6' बाबतही मोठी घोषणा करण्यात आली आहे. अभिनेता सलमान खानने घोषणा केली की 'बिग बॉस 15'ची विजेती तेजस्वी प्रकाश 'नागिन 6'ची नागिन बनणार ( Tejaswi Prakash Nagin Season 6 ) आहे.
हेही वाचा - Aurangabad Election 2022 : 'बायको पाहिजे' औरंगाबादमध्ये बॅनरची चर्चा; संतप्त नागरिकांनी शाही फेकत केला निषेध