ETV Bharat / sitara

बिग बीने चाहत्यांना दिले 'गुलाबो सीताबो' टंग ट्विस्टर चॅलेंज - gulabo sitabo challenge

शुजित सिरकरच्या बहुप्रतिक्षित गुलाबो सीताबोच्या रिलीजच्या अगोदर मुख्य अभिनेता अमिताभ बच्चन यांनी सोशल मीडियावर प्रेक्षकांना नवीन टंग ट्विस्टर चॅलेंज देण्याचे आवाहन केले.

Big B introduces Gulabo Sitabo tongue twister challenge
बिग बीने चाहत्यांना दिले 'गुलाबो सीताबो' टंग ट्विस्टर चॅलेंज
author img

By

Published : Jun 9, 2020, 9:06 PM IST

मुंबई - मेगास्टार अमिताभ बच्चन यांनी सोशल मीडियावरुन टंग ट्विस्टर चॅलेंज दिले आहे. गुलाबो सिताबोच्या प्रमोशनचा हा एक भाग आहे. हा चित्रपट प्राईम व्हिडिओवर १२ जूनला ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज होणार आहे.

जिभेला चिमटा देणारे हे चॅलेंज आहे. त्यांनी लिहिलंय, : 'गुलाबो की खटर-पटर से टाइटर-बिटर सीताबो, सीताबो के अगर-मगर से उत्थल-पुथल गुलाबो', चित्रपटाच्या मुख्य पात्रांची मजेदार आणि अनोखी मैत्री यातून प्रतिबिंबित होते.

इंस्टाग्रामवर बिग बीने लिहिले आहे: "बस 5 बार बोलना है ये जीभ ट्विस्टर ... कोशिश करेंगे आप लोग ... करेंगे तो हमारी चांदी हो जाएगी ... शिवाय एक के!"

सोशल मीडियावर सक्रिय असलेल्या बच्चनने स्वत: चा एक व्हिडिओ इन्स्टाग्रामवर पोस्ट केला आहे, यामध्ये मजेशीर टंग ट्विस्टर चॅलेंज करताना ते दिसतात. त्यांनी पाच वेळा हे वाक्य बोलण्याचे आवाहन केलंय.

लॉकडाऊनमुळे १७ एप्रिलला रिलीज होणारा हा चित्रपट कधी रिलीज होईल याची प्रतीक्षा होती. मात्र आयुष्यमान आणि अमिताभ यांच्या चाहत्यांना ही पर्वणी १२ जूनला मिळणार आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.