ETV Bharat / sitara

भूमी पेडणेकरला कोरोनाची लागण, 'शूटर दादी'ने दिल्या बरे होण्यासाठी सदिच्छा - भूमी पेडणेकरची कोविड चाचणी पॉझिटीव्ह

अभिनेत्री भूमी पेडणेकरला कोरोनाची लागण झाली आहे. आपली कोरोना चाचणी पॉझिटीव्ह आल्याचे तिने चाहत्यांना कळवले आहे. सध्या ती घरी क्वारंटाईनमध्ये आहे.

Bhumi Pednekar tests COVID-19 positive
भूमी पेडणेकरला कोरोनाची लागण
author img

By

Published : Apr 5, 2021, 1:18 PM IST

मुंबई - बॉलिवूड स्टार भूमी पेडणेकर हिने सोमवारी सांगितले की, तिची कोरोनाची चाचणी पॉझिटीव्ह आली असून तिला कोविड१९ ची सौम्य लक्षणे आहेत. ती घरीच क्वारंटाईनमध्ये राहात असून डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखाली उपचार घेत आहे.

भूमीने इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली असून त्यात तिने लिहिलंय, "माझी कोविड-१९ ची चाचणी पॉझिटीव्ह आली आहे. आज मला सौम्य लक्षणे आहेत, परंतु मला बरे वाटते. मी आयसोलेशनमध्ये आहे. डॉक्टरांनी सांगितलेले प्रोटोकॉल मी पाळत आहे. तुमच्या पैकी कोणी जर माझ्या संपर्कात आले असेल तर त्यांनी कृपया त्वरित कोविडची चाचणी करुन घ्यावी."

भूमीच्या इन्स्टाग्रामवर कॉमेंट सेक्शनमध्ये तिला असंख्य शुभ संदेश मिळत आहेत. यामध्ये बॉलिवूडच्या अनेकांनी तिला लवकर बरी होण्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत. यामध्ये शूटर दादी चंद्रो तोमर यांनीही तिला शुभेच्छा दिल्या आहेत. आपल्याला आठवत असेल साँड की आँख या चित्रपटात भूमीने चंद्रो तोमर यांची व्यक्तीरेखा साकारली होती.

लोकांनी सावधगिरी बाळगण्याची विनंती भूमी पेडणेकरने केली आहे. स्टीम घ्या, व्हिटॅमिन सी, चांगला आहार घ्या आणि आनंदीत रहा. मास्क वापरा, हात धुत रहा, सामाजिक अंतर राखून ठेवा असे आवाहन तिने केलंय.

हेही वाचा - बीजापूर चकमक : चारशे नक्षलवाद्यांनी दीड हजार जवानांना घेरुन केला हल्ला; अधिकाऱ्यांची माहिती

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.