ETV Bharat / sitara

‘भुज: द प्राइड ऑफ इंडिया' : साहसाची सत्यकथा १३ ऑगस्टला ओटीटीवर - अजय देवगणचा आगामी चित्रपट

अजय देवगण अभिनित ‘भुजः 'प्राइड ऑफ इंडिया' येत्या १३ ऑगस्ट २०२१ रोजी डिस्ने+ हॉटस्टार व्हीआयपी आणि डिस्ने+ हॉटस्टार प्रीमियमवर प्रदर्शित होणार आहे. हा चित्रपट १९७१ साली घडलेल्या भारत-पाकिस्तान युद्धातील खऱ्या घटनेवर आधारित आहे.

‘भुज: द प्राइड ऑफ इंडिया'
‘भुज: द प्राइड ऑफ इंडिया'
author img

By

Published : Jul 6, 2021, 10:20 PM IST

गेल्या वर्षी तान्हाजी मालुसरेचा बायोपिक केल्यानंतर अभिनेता अजय देवगण अजून एक बायोपिक घेऊन येतोय. ‘तान्हाजी : द अनसंग हिरो’ हा चित्रपट ऐतिहासिक काळातील होता आणि ‘भुज: द प्राइड ऑफ इंडिया' वॉर-फिल्म आहे. हा चित्रपट १९७१ साली घडलेल्या भारत-पाकिस्तान युद्धातील खऱ्या घटनेवर आधारित आहे. १४ दिवसांत ३५ वेळा हल्ला करून ९२ बॉम्ब्स आणि २२ रॉकेट्स वापरत पाकिस्तान ने हवाईअड्डा उध्वस्त केला होता. तेथील भुज विमानतळाचा कारभार पाहणारे निर्भय आयएएफ-स्क्वाड्रन विजय कर्णिक यांनी, आपल्या देशाच्या संरक्षणासाठी, मधापार तालुक्यातील स्थानिक खेड्यातील ३०० महिलांच्या मदतीने संपूर्ण आयएएफ-एअरबेसचे पुन्हा बांधकाम कसे केले हे या चित्रपटाद्वारे प्रेरणाप्रत दर्शविण्यात आले आहे.

‘भुज: द प्राइड ऑफ इंडिया'

‘भुज: द प्राइड ऑफ इंडिया' या चित्रपटातून भुजमधील अनेक धाडसी लोकांनी भारताच्या विजयासाठी एकत्रितपणे कसे कार्य केले आणि एक मिलिटरी मिशन पूर्ण करण्यात कसा हातभार लावला याचे चित्रीकरण सजगपणे करण्यात आले आहे. नुकत्याच प्रदर्शित झालेल्या चित्रपटाच्या मोशन पोस्टर मधून हा चित्रपट सत्तरीच्या दशकात डोकावताना दिसतो. तसेच पॉवरफुल ॲक्शन, हृदय पिळवटणाऱ्या भावना व घटना, प्रेम आणि देशभक्ती हेदेखील यात ठासून भरलेले दिसते.

टी-सिरीज आणि अजय देवगण फिम्स प्रस्तुत ‘भुजः 'प्राइड ऑफ इंडिया' या चित्रपटाची निर्मिती भूषण कुमार, कुमार मंगत पाठक, गिन्नी खानुजा, वजीर सिंग आणि बनी संघवी यांनी ‘सिलेक्ट मीडिया होल्डिंग्स एलएलपी’ या बॅनरअंतर्गत केली आहे. अभिषेक दुधैया, रमण कुमार, रितेश शहा आणि पूजा भवोरिया यांनी याचे कथानक लिहिले असून अभिषेक दुधैया यांनी दिग्दर्शनाची धुरा वाहिली आहे. या चित्रपटात अजय देवगण सोबत संजय दत्त, सोनाक्षी सिन्हा, अम्मी विर्क, नोरा फतेही आणि शरद केळकर या कलाकारांच्याही महत्वपूर्ण भूमिका आहेत.

अजय देवगण अभिनित ‘भुजः 'प्राइड ऑफ इंडिया' येत्या १३ ऑगस्ट २०२१ रोजी डिस्ने+ हॉटस्टार व्हीआयपी आणि डिस्ने+ हॉटस्टार प्रीमियमवर प्रदर्शित होणार आहे.
हेही वाचा - रणवीर-आलियाच्या 'प्रेमकहानी'त धर्मेंद्र, जया बच्चन आणि शबाना आझमीची एन्ट्री

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.