ETV Bharat / sitara

कुटुंबाने लग्नाला केलेला विरोध आठवून भाग्यश्रीला झाले अश्रू अनावर

author img

By

Published : Mar 1, 2022, 12:51 PM IST

भाग्यश्री आणि हिमालयाचे 1990 मध्ये लग्न झाले होते. स्मार्ट जोडी या रिअॅलिटी शोमध्ये दिसणारे हे जोडपे राष्ट्रीय टेलिव्हिजनवर आठवणींच्या प्रदेशात फेरफटका मारुन आले. हिमालयाशी लग्न करण्यावर कुटुंबीयांचा आक्षेप होता हे आठवून भाग्यश्रीला शोमध्ये अश्रू अनावर झाले.

भाग्यश्री हिमालया स्मार्ट जोडी
भाग्यश्री हिमालया स्मार्ट जोडी

मुंबई - बॉलीवूड अभिनेत्री भाग्यश्री तिचा पहिला चित्रपट 'मैने प्यार किया' रिलीज झाल्यानंतर रातोरात स्टार बनली. मात्र प्रियकर हिमालय दसानीशी लग्न केल्यानंतर स्वतःला रुपेरी पडद्यापासून दूर ठेवणेच तिने पसंत केले. त्यांच्या विवाहाला दोन्ही बाजूंकडून विरोध होता. त्यामुळे मोठ्या संघर्षातून हे जोडपे एकत्र आले.

भाग्यश्री आणि हिमालयाचे 1990 मध्ये लग्न झाले. स्मार्ट जोडी या रिअॅलिटी शोमध्ये दिसणारे हे जोडपे राष्ट्रीय दूरचित्रवाणीवरील आठवणींच्या प्रदेशात फेरफटका मारुन आले. हिमालयाशी लग्न करण्यावर कुटुंबीयांचा आक्षेप होता हे आठवून भाग्यश्रीला शोमध्ये अश्रू आले. आई-वडिलांच्या इच्छेविरुद्ध त्यांना कसे लग्न करावे लागले याबद्दल बोलताना भाग्यश्रीला आपले अश्रू आवरता आले नाहीत.

अभिनेत्री भाग्यश्री म्हणाली, "माझ्या लग्नात माझ्या कुटुंबातील कोणीही हजर नव्हते आणि माझ्या पतीच्या बाबतीतही असेच होते. जेव्हा मी माझ्या पालकांना सांगितले की मला त्याच्याशी लग्न करायचे आहे, तेव्हा ते सहमत झाले नाहीत." भाग्यश्री पुढे म्हणाली की पालकांना त्यांच्या मुलांसाठी स्वप्ने आणि महत्त्वाकांक्षा असतात, परंतु त्यांनी मुलांना त्यांच्यासाठी सर्वोत्तम काय आहे हे निवडण्याची परवानगी दिली पाहिजे.

मनीष पॉल होस्ट करत असलेल्या या शोमध्ये खऱ्या आयुष्यातील सेलिब्रिटी जोडप्यांना वेगवेगळ्या आव्हानांचा सामना करावा लागतो आणि त्यांची न पाहिलेली केमिस्ट्री, कथा आणि रोमँटिक क्षण दाखवले जातात.

भाग्यश्री आणि हिमालया यांच्या शिवाय स्मार्ट जोडीमध्ये बिग बॉसचे माजी स्पर्धक राहुल महाजन आणि त्याची पत्नी नताल्या इलिना, विक्रांत सिंग आणि मोनालिसा, गुम है किसी प्यार में कलाकार आणि वास्तविक जीवनातील जोडपे नील भट्ट आणि ऐश्वर्या शर्मा, अर्जुन बिजलानी आणि त्याची पत्नी नेहा स्वामी बिजलानी, अंकिता लोखंडे आणि तिचा पती विकी जैन यासह इतर अनेक प्रसिद्ध पॉवर कपल्स दिसणार आहेत.

हेही वाचा - Former Miss Ukraine :युध्दाच्या मैदानात शस्त्रांसह उतरली युक्रेनची सौंदर्यवती

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.