ETV Bharat / sitara

'बधाई दो'सह एलजीबीटीक्यू+ नात्यावर आधारित बॉलिवूड चित्रपट - एलजीबीटीक्यू+ बॉलिवूड चित्रपट

LGBTQ+ (Lesbian, Gay, Bisexual, Transgender ) समुदायाबद्दल आता बॉलिवूडच्या मुख्य प्रवाहात उघडपणे बोलले जात आहे. या परिस्थितीत या संवेदनशील विषयावर आधारित 'बधाई दो' या चित्रपटासह अशा चित्रपटांबद्दल चर्चा करणार आहोत, ज्यांनी या संवेदनशील विषयाची लोकांना जाणीव करून दिली.

एलजीबीटीक्यू+ बॉलिवूड चित्रपट
एलजीबीटीक्यू+ बॉलिवूड चित्रपट
author img

By

Published : Jan 27, 2022, 7:04 PM IST

मुंबई - एलजीबीटीक्यू+ लेस्बियन, गे, बायसेक्शुअल, ट्रान्सजेंडर ( LGBTQ+ Lesbian, Gay, Bisexual, Transgender ) समुदायाबद्दल आता बॉलिवूडमध्ये उघडपणे बोलले जात आहे. गेल्या काही वर्षांत बॉलीवूडमधील चित्रपटांमुळे या गहन विषयाकडे बघण्याचा लोकांचा दृष्टीकोन बदलला आहे. असे असले तरी एक मोठा बदल होणे अद्याप बाकी आहे. या शृंखलेत आणखी एका 'बधाई दो' या चित्रपटाची भर पडणार आहे. नुकत्याच प्रदर्शित झालेल्या 'बधाई दो' या चित्रपटाच्या ट्रेलरने लोकांना याची जाणीव करुन दिली आहे. हा चित्रपट 11 फेब्रुवारीला रिलीज होत आहे. आपण LGBTQ + समुदायावर आधारित आहेत काही बॉलिवूड चितरपटांची माहिती घेणार आहोत.

बधाई दो

बधाई दो
बधाई दो

दिग्दर्शक अमित शर्माच्या आयुष्मान खुराना आणि सान्या मल्होत्रा ​​स्टारर 'बधाई हो' (2018) च्या अफाट यशानंतर, 'बधाई दो'मध्ये एक वेगळा विषयहाताळण्याचा प्रयत्न करण्यात आलाय. बधाई हो या चित्रपटाचा बधाई दो हा सिक्वेल हर्षवर्धन कुलकर्णीने बनवला आहे. याआधी हर्षवर्धनने हंटर, हसी तो फसी आणि अमेरिकी पंडित हे चित्रपट केले आहेत. 'बधाई दो' चित्रपटाच्या आशयाबद्दल सांगायचे तर हा चित्रपट गे कॉप (राजकुमार राव) आणि लेस्बियन फिजिकल टीचर (भूमी पेडणेकर) यांच्या लव्हेंडर विवाहावर आधारित आहे.

चंदीगड करे आशिकी

चंदीगड करे आशिकी
चंदीगड करे आशिकी

नुकताच प्रदर्शित झालेला चंदीगड करे आशिकी हा चित्रपटही याच मुद्द्यावर आधारित एक मनोरंजक चित्रपट होता. चित्रपटात आयुष्मान खुराना एका ट्रान्स वुमन मुलीच्या (वाणी कपूर) प्रेमात पडतो. जेव्हा आयुष्मानला चित्रपटातील वाणीचे हे रूप कळते, तेव्हा सुरुवातीला त्याला फसवणूक झाल्याचे वाटू लागते. दिग्दर्शक अभिषेक कपूरने हा चित्रपट अतिशय साधेपणाने सादर केला आहे, जो प्रेक्षकांच्या हृदयाला भिडतो.

शुभ मंगल ज्यादा सावधान

शुभ मंगल ज्यादा सावधान
शुभ मंगल ज्यादा सावधान

बॉलीवूडचा विकी डोनर अभिनेता आयुष्मान खुराना एलजीबीटी + समुदायाच्या चित्रपटांमध्ये सर्वात अचूकपणे बसतो. दिग्दर्शक हितेश केवल्याच्या शुभ मंगल ज्यादा सावधान (2020) या चित्रपटात त्याने असेच काही केले. 'एक लडकी को देखा तो ऐसा लगा' या चित्रपटानंतर पुन्हा एकदा मुख्य प्रवाहातील चित्रपटात असा विषय मांडल्याबद्दल निर्मात्यांचे कौतुक करायला हवे. हा चित्रपट कार्तिक (आयुष्मान खुराना) आणि अमन (जितेंद्र कुमार) यांच्या समलिंगी संबंधांवर आधारित एक मजेदार चित्रपट होता.

एक लड़की को देखा तो ऐसा लगा

एक लड़की को देखा तो ऐसा लगा
एक लड़की को देखा तो ऐसा लगा

चित्रपट दिग्दर्शक शेली चोप्रा धर यांचा चित्रपट 'एक लडकी को देखा तो ऐसा लगा' (2019) हा देखील समलैंगिकतेवर आधारित आहे. या चित्रपटामध्ये सोनम कपूरने चांगले काम केले आहे. सोनम कपूरने चित्रपटातील तिची एक मैत्रीण रेजिना कासद्रा हिच्यासाठी 'एक लडकी को देखा तो ऐसा लगा' हे गाणे गायले आहे. वास्तविक चित्रपटाची कथा पंजाबच्या मुकेश अंबानी म्हणजेच चौधरी बलविंदर सिंग (अनिल कपूर) यांचा कपड्यांचा व्यवसाय आहे. तो लग्नासाठी दिल्लीला जातो तिथे त्याची मुलगी स्वीटी हिची भेट कुहूसोबत (रेजिना कसंड्रा) होते. साहिल मिर्झा (राजकुमार राव) हा नाटककार आहे. स्वीटी (सोनम कपूर) आणि कुहूची कहाणी इथून सुरू होते.

कपूर अँड सन्स

कपूर अँड सन्स
कपूर अँड सन्स

कपूर अँड सन्स हा LGBTQ+ समुदायावरील बॉलीवूडमधील पहिला चित्रपट असल्याचे म्हटले जाते. बॉलिवूडच्या मुख्य प्रवाहात या समाजावर बनलेला हा पहिलाच चित्रपट आहे. या चित्रपटात आलिया भट्ट, सिद्धार्थ मल्होत्रा ​​आणि पाकिस्तानी अभिनेता फवाद खान यांच्या प्रमुख भूमिका आहेत. चित्रपटात फवाद खान आणि सिद्धार्थ मल्होत्रा ​​यांनी एका अकार्यक्षम कुटुंबात विभक्त झालेल्या भावांची भूमिका साकारली होती. चित्रपटात मोठा टर्निंग पॉइंट येतो जेव्हा चित्रपटात फवाद खानच्या आईच्या भूमिकेत दिसणारी रत्ना पाठक शाहला तिचा मुलगा (फवाद खान) समलैंगिक असल्याचे कळते आणि तीदेखील हे स्वीकारते.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.