मुंबई - अभिनेता आयुष्यमान खुराणा विविध भूमिका साकारणार कलाकार म्हणून परिचीत आहे. आता त्याचा 'आर्टिकल १५' हा चित्रपट येतोय याच्या प्रमोशनमध्ये गुंतला आहे. यासाठी त्याने 'डोन्ट से भंगी' (#DontSayBhangi ) मोहिम सुरू केली आहे.
-
Galti toh kisi se bhi ho sakti hai, par hum kisiki tulna neechi jaati ke logo se kyun karte hai?
— Ayushmann Khurrana (@ayushmannk) June 17, 2019 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
Kya inke khilaaf apka yeh nazaria theek hai? Isse aaj hi badaliye. Sign the petition #DontSayBhangi, now.
Click https://t.co/JpxhGWloT6
@anubhavsinha #Article15 pic.twitter.com/RxJLXWUIjq
">Galti toh kisi se bhi ho sakti hai, par hum kisiki tulna neechi jaati ke logo se kyun karte hai?
— Ayushmann Khurrana (@ayushmannk) June 17, 2019
Kya inke khilaaf apka yeh nazaria theek hai? Isse aaj hi badaliye. Sign the petition #DontSayBhangi, now.
Click https://t.co/JpxhGWloT6
@anubhavsinha #Article15 pic.twitter.com/RxJLXWUIjqGalti toh kisi se bhi ho sakti hai, par hum kisiki tulna neechi jaati ke logo se kyun karte hai?
— Ayushmann Khurrana (@ayushmannk) June 17, 2019
Kya inke khilaaf apka yeh nazaria theek hai? Isse aaj hi badaliye. Sign the petition #DontSayBhangi, now.
Click https://t.co/JpxhGWloT6
@anubhavsinha #Article15 pic.twitter.com/RxJLXWUIjq
आयुष्यमानने एक व्हिडिओ क्लिप सोशल मीडियावर शेअर केली आहे. यातून तो लोकांना या मोहिमेबद्दल सांगत, सहभागी होण्याचे आवाहन करीत आहे.
या व्हिडिओत एक लहान मुलगा पोलिस स्टेशनमध्ये चहा घेऊन येतो. तेव्हा इन्स्पेक्टरच्या केबीनमध्ये उभा असलेला कॉन्स्टेबल त्या मुलाकडून चहा घेतो. त्यानंतर किती भंगी चहा बनवला आहेस असा दम त्या मुलाला देतो. मुलगा दुसरा चहा आणतो म्हणत निघून जातो. त्यावर इन्स्पेक्टर असलेला आयुष्यमान म्हणतो की, "किती खराब चहा होता...भंगी चहा होता...आपण किती सहजपणे असे म्हणत असतो हे...ही शिवी एका जातीची ओळख बनली आहे..आर्टिकल १५ सांगते की कोणत्याही प्रकारचा भेदभाव गुन्हा आहे.", असे म्हणत हे रोखण्याचे आवाहन करतो. या व्हिडिओला उत्तम प्रतिसाद मिळत आहे.
'आर्टिकल १५' हा चित्रपट अनुभव सिन्हा यांनी दिग्दर्शित केलाय. काही दिवसापूर्वी याचा थरकाप उडवणारा ट्रेलर रिलीज झाला होता. या चित्रपटात आयुष्यमानसह मनोज पाहवा, सयानी गुप्ता, कुमुद मिश्रा, एम. नसीर, आशिष वर्मा, सुशिल पांडे, सुब्रज्योती भारत यांच्या प्रमुख भूमिका आहेत.
२८ जूनला हा चित्रपट रिलीज होणार आहे.