मुंबई - शुक्रवारी ६६ वा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार जाहीर झाला. यावेळी अष्टपैलू अभिनेता आयुष्मान खुराणाला अंधाधून या सिनेमासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार जाहीर झाला. यावर प्रतिक्रिया देत आपण खूप आनंदी असल्याचं आयुष्मानने म्हटलं होतं. आता यापाठोपाठ त्यानं आपला जीवनप्रवास सांगणारी एक खास कविता इन्स्टाग्रामवर शेअर केली आहे.
या कवितेत तो अभिनय श्रेत्रात नशीब आजमवण्यासाठी सुरू केलेल्या मुंबईच्या प्रवासापासून रस्त्यात आलेले अडथळे आणि या सगळ्यातही मुंबईच्या गर्दीप्रमाणेच डोळ्यात भरलेल्या असंख्य स्वप्नांचे वर्णन करताना दिसत आहे. कवितेच्या शेवटच्या कडव्यात आयुष्मानने आपल्याला मिळालेल्या राष्ट्रीय पुरस्काराचा उल्लेख केला आहे.
- " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">
उठून पडलो, पडून पुन्हा उठलो...चाललो..उडलो आणि यातूनच लागलेल्या ठेचेमुळे आज माझ्या नावावर राष्ट्रीय पुरस्कार आहे, असं तो यात म्हणताना दिसत आहे. याशिवाय आयुष्मानने विकी कौशलला जाहीर झालेल्या सर्वोत्कृष्ट अभिनेत्याच्या पुरस्कारासाठी त्याचंही अभिनंदन केलं आहे.