मुंबई - बॉलिवूड अभिनेता आयुष्मान खुराना त्याच्या आगामी चित्रपटात अॅथलिटच्या भूमिकेत दिसणार आहे. यासाठी तो खूप मेहनत घेत असून आयुष्यमानने इन्स्टाग्रामवर एक फोटो शेअर केला आहे, यात तो जिममध्ये वजन उचलताना दिसत आहे.
- View this post on Instagram
It’s going to be a different me in this different film. Movie prep going strong 💪 @gattukapoor
">
त्याने फोटोच्या कॅप्शनमध्ये लिहिले आहे, "वेगळ्या चित्रपटासाठी वेगळे बदल. चित्रपटाची तयारी आणखी मजबूत."
रोमँटिक प्रेमकथा अलेल्या या आगामी चित्रपटात अभिनेता आयुष्यमान अॅथलिटची भूमिका साकारताना दिसणार आहे. या चित्रपटाचे शीर्षक अद्याप ठरलेले नाही. उत्तर भारताच्या पार्श्वभूमीवर या चित्रपटाची कथा गुंफण्यात आली आहे. या महिन्यात शूटिंग सुरू होईल. पुढील वर्षी हा चित्रपट जगभरातील चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे.