मुंबई - अभिनेता अर्जुन कपूर आणि त्याची प्रेमिका मलायका अरोरा ही जोडी शुक्रवारी मुंबईतील एका रेस्टॉरंटमधून बाहेर पडताना दिसली. लो प्रोफाइल संबंध ठेवण्यासाठी हे जोडपे ओळखले जाते. मलायका आणि अर्जुन कधीच मीडियाला सहजी सामोरे जात नाहीत.
मुंबईच्या खार परिसरातील एका जपानी रेस्टॉरंटमध्ये रात्रीचे जेवण केल्यानंतर मलायका आणि अर्जुन हौशी कॅमेरामन्सच्या नजरेस पडले. डाइन-आउटसाठी बाहेर पडलेल्या मलायकाने पांढरा शर्ट आणि लांब हातांचा डेनिम शॉर्ट्स परिधान केला होता तर अर्जुन मॅचिंग डेनिमसह काळ्या टी-शर्टमध्ये दिसला. मलायका आणि अर्जुन 2018 पासून एकत्र आहेत. त्यांना हातात हात घालून रेस्टॉरंटमधून बाहेर पडताना चित्रित केले गेले.
अर्जुन कपूरचे आगामी चित्रपट
अर्जुन आणि मलायकाला त्यांच्या व्यावसायिक जीवनात देखील खूप आनंदी आहेत. अर्जुनने अलिकडेच रिलीज झालेल्या हॉरर-कॉमेडी 'भूत पोलिस'मध्ये काम केले होते. त्याच्याकडे एक व्हिलन: रिटर्न्स आणि आस्मान भारद्वाज याचा दिग्दर्शिकीय पदार्पणाचा 'कुत्ते' हा चित्रपट आहे.
मलायका उद्येगाचा वाढवणार विस्तार
मलायका एक उद्योजक म्हणून आपली कक्षा वाढवण्यासाठी बिझी झाली आहे. फॅशनच्या जगतात ई-कॉमर्स ब्रँड लेबल लाइफसोबत तिने हातमिळवणी केली आहे. योगा फिटनेस आणि तिचे अलिकडील रिबेल फूड्सच्या न्यूड बाऊल या स्वच्छ खाण्याच्या उपक्रमासाठी ती योगदान देत आहे.
हेही वाचा - गावकऱ्यांची चिंता मिटणार, आता ATM मधूनही औषधं मिळणार