ETV Bharat / sitara

अर्जून 'पानिपत'च्या सेटवर परतला, फोटो शेअर करत दिली माहिती

'पानिपत'च्या तिसऱ्या युद्धावर आधारीत हा चित्रपट असणार असून आशुतोष गोवारीकर या चित्रपटाचे दिग्दर्शन करणार आहेत. अर्जुन कपूर यात सदाशिवराव भाऊ यांची भूमिका साकारणार आहे.

अर्जून 'पानिपत'च्या सेटवर परतला
author img

By

Published : May 9, 2019, 9:49 AM IST

मुंबई - अभिनेता अर्जून कपूर लवकरच 'इंडियाज मोस्ट वॉन्टेड' चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. काही दिवसांपूर्वीच या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला. यानंतर चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यग्र असणारा अर्जून आता आपल्या आगामी चित्रपटासाठी पुन्हा एकदा सेटवर परतला आहे.

सध्या तो आपल्या 'पानिपत' चित्रपटाच्या सेटवर परतला असून फोटो शेअर करत त्याने याबद्दलची माहिती दिली आहे. 'बॅक टू पानिपत' असं कॅप्शन देत अर्जूनने ड्रेसिंग रूममधील आपला एक फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये अर्जूनचा पानिपतमधील लूक पाहायला मिळत आहे.

arjun kapoor
अर्जून 'पानिपत'च्या सेटवर परतला

'पानिपत'च्या तिसऱ्या युद्धावर आधारीत हा चित्रपट असणार असून आशुतोष गोवारीकर या चित्रपटाचे दिग्दर्शन करणार आहेत. अर्जुन कपूर यात सदाशिवराव भाऊ यांची भूमिका साकारणार आहे. या चित्रपटात अर्जून कपूरशिवाय संजय दत्त आणि क्रिती सेनॉनही मुख्य भूमिकेत झळकणार असल्याचे म्हटले जात आहे.

Intro:Body:

dummy

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.