मुंबई - अरबाज खान आणि मलायका अरोराने काही कारणांमुळे २०१७ मध्ये आपल्या नात्याला पूर्णविराम देत घटस्फोट घेतला. घटस्फोटानंतर आता दोघांनीही आपल्या पद्धतीने नवे संसार उभे करण्याचा निर्णय घेतल्याच्या बातम्या गेल्या अनेक दिवसांपासून समोर येत आहेत.
मलायका लवकरच अर्जून कपूरसोबत लग्नगाठ बांधणार असल्याचे म्हटले जात आहे. तर अरबाजही लवकरच विदेशी बाला जॉर्जियासोबत विवाहबंधनात अडकणार असल्याचे म्हटले जात आहे. नुकतंच एका कार्यक्रमात घटस्फोट घेतल्यानंतर लग्नसंस्थेवर तुझा विश्वास आहे का? असा प्रश्न अरबाजला करण्यात आला.
या प्रश्नावर अरबाजने अत्यंत शांतपणे उत्तर दिले. अनेकदा लग्न तुटतात, मात्र याचा अर्थ विवाहसंस्था खराब आहे असा नाही. आमचे लग्न तुटले, त्याबद्दल मला जराही तक्रार नाही. आता कदाचित मी नव्याने संसार सुरु करेन. असे म्हणत एक दिवस तुम्ही मरणार आहे हे माहित झाल्यावर तुम्ही जगणं सोडून देता का? असा प्रश्न अरबाजने केला आहे.