मुंबई - लुका छुपी या सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीला आलेला अभिनेता अपारशक्ती खुराणा लवकरच पती पत्नी और वो सिनेमातून प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यासाठी सज्ज झाला आहे. नुकतंच या सिनेमाचं लखनौमधील चित्रीकरण पूर्ण झालं असून याच निमित्तानं अपारशक्तीनं एक पोस्ट शेअर केली आहे.
आपल्या इन्स्टाग्राम स्टोरीवरुन त्याने एक फोटो शेअर केला आहे. याला कॅप्शन देत पती पत्नी और वोच्या लखनौ शेड्यूलचं चित्रीकरण पूर्ण झालं असल्याचं म्हटलं आहे यासोबतच अपारशक्तीनं फोटोतील प्रत्येकाची ओळखही करुन दिली आहे. यात त्याच्या हेअर स्टाईलिस्ट, मेकअप आर्टिस्ट आणि पर्सनल असिस्टंट यांचा समावेश आहे.
![अपारशक्ती खुराणा](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/4378049_apar.jpg)
या तिघांनी माझं आयुष्य अगदीचं सोपं करुन टाकलं, असं अपारशक्तीनं कॅप्शनमध्ये म्हटलं. पुढे तो म्हणाला, भेटा इरफानला...एक उत्तम हेअर स्टाईलिस्ट...यानंतर महेश मेकअप आर्टिस्ट आणि अखेर माझा शिवा, तो या बॅगमध्ये सगळं काही सांभाळतो. अगदी प्रेमसुद्धा, असं अपारशक्तीनं म्हटलं आहे.