मुंबई - अभिनेता आयुष्यमान खुराणाचा भाऊ अपारशक्ती खुराणा गेल्या काही दिवसांपासून बॉलिवूडमध्ये सक्रीय झालेला पाहायला मिळत आहे. आज अपारशक्ती आणि पत्नी आक्रिती अहुजा यांच्या लग्नाला पाच वर्ष पूर्ण झाले आहेत. याच निमित्ताने दोघांनीही एकमेकांसाठी खास पोस्ट शेअर केल्या आहेत.
अपारशक्तीनं आपल्या लग्नातील एक फोटो शेअर केला आहे. याला दिलेल्या कॅप्शनमध्ये त्यानं लिहिलं, या सुंदर क्षणाला पाच वर्ष पूर्ण, एका अतिशय सुंदर व्यक्तीसोबतची. याशिवाय अपारशक्तीनं आपल्या इन्स्टाग्राम स्टोरीवरुन पत्नीसोबतचे अनेक फोटोही शेअर केले आहेत.
- View this post on Instagram
5 years to this beautiful moment with the most beautiful @aakritiahuja #HappyAnniversary #Kuckoo
">
आक्रितीनंही आपल्या इन्स्टाग्रामवरुन एक फोटो शेअर केला आहे. तुझ्यासोबत घालवलेली पाच वर्ष, ही अगदी पाच मिनिटांसारखी गेली, असं तिनं कॅप्शनमध्ये म्हटलं आहे. अपारशक्ती आणि आक्रितीची भेट चंदीगडमध्ये एका डान्स क्लास दरम्यान झाली होती.
- " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">