ETV Bharat / sitara

कंगनाची बहिण रंगोलीचा तापसीला टोला; अनुराग कश्यप म्हणाला, हे अति होतंय - rajkumar rao

काही लोक कंगनाला कॉपी करूनच आपलं दुकान चालवतात. मात्र, कंगनाच्या एखाद्या चित्रपटाची प्रशंसा करताना तिच्या नावाचा उल्लेखही ते करत नाहीत. तापसी तू सस्ती कॉपी करणं थांबवायला हवं, असं रंगोलीनं ट्विटमध्ये म्हटले आहे.

अनुराग कश्यप म्हणाला, हे अति होतंय
author img

By

Published : Jul 4, 2019, 1:38 PM IST

मुंबई - अभिनेत्री कंगना रनौतची बहिण रंगोली चर्चेत राहण्यासाठी नेहमीच कलाकारांबद्दल वादग्रस्त विधानं करताना दिसते. आता पुन्हा एकदा रंगोलीने अभिनेत्री तापसी पन्नूला सस्ती कॉपी म्हणत वाद ओढावून घेतला आहे. या वादाची सुरूवात झाली कंगनाच्या जजमेंटल हैं क्या चित्रपटाच्या ट्रेलरपासून.

कंगना आणि राजकुमार रावच्या जजमेंटला हैं क्याचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित करण्यात आला आहे. या ट्रेलरवर प्रतिक्रिया देत तापसीने ट्रेलर फारच उत्तम असून याच्याकडून कायमच अधिक अपेक्षा होत्या, असं म्हणत एकता कपूरला टॅग केलं आहे. मात्र, यात कंगनाच्या नावाचा कुठेही उल्लेख केला नसल्याने रंगोलीने तापसीवर निशाणा साधला आहे.

  • Kuch log Kangana ko copy kar ke he apni dukaan chalate hain, magar pls note, they never acknowledge her not even a mention of her name in praising the trailer, last I heard Taapsee ji said Kangana needs a double filter and Tapsee ji you need to stop being a sasti copy 🙏 https://t.co/5eRioUxPic

    — Rangoli Chandel (@Rangoli_A) July 3, 2019 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

काही लोक कंगनाला कॉपी करूनच आपलं दुकान चालवतात. मात्र, कंगनाच्या एखाद्या चित्रपटाची प्रशंसा करताना तिच्या नावाचा उल्लेखही ते करत नाहीत. मागच्या वेळी मी तापसीचं बोलणं ऐकलं तेव्हा कंगनाला डबल फिल्टरची गरज असल्याचे तिने म्हटले होते. तापसी तू सस्ती कॉपी करणं थांबवायला हवं, असं तिनं आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.

  • Come on Rangoli.. this is going too far.. this is really really desperate.. I really don’t know what to say to this . Having worked with both your sister and Taapsee .. I just don’t get this ..praising the trailer means praising all aspect of it. Which includes Kangana https://t.co/tkG5KwyFHi

    — Anurag Kashyap (@anuragkashyap72) July 3, 2019 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

रंगोलीच्या या ट्विटवर तापसीनं काहीही उत्तर दिलं नाही. मात्र दिग्दर्शक अनुराग कश्यपने रंगोलीला चांगलंच सुनावलं आहे. रंगोली हे अति होतंय. हे अतिशय वाईट आहे. यावर काय बोलू मलाच समज नाहीये. मी तुझी बहिण आणि तापसी दोघींसोबतही काम केले आहे. एवढंच सांगेल की, एखाद्या चित्रपटाच्या ट्रेलरची प्रशंसा करणे म्हणजे त्यातील प्रत्येक गोष्टीची प्रशांसा करणे आहे. त्यामुळे यात कंगनाही आलीच, असे अनुरागने म्हटले आहे.

Intro:Body:Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.