मुंबई - बर्फी या सुपरहिट चित्रपटाचे दिग्दर्शक अनुराग बासु लवकरच एक नवीन चित्रपट घेऊन प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. दरम्यान चित्रपटाचे नाव अद्याप निश्चित झाले नसले तरी प्रदर्शनाची तारीख मात्र ठरली आहे. २०२० मध्ये जानेवारी महिन्यात हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
चित्रपटात अभिषेक बच्चन, राजकुमार राव, आदित्य रॉय कपूर, फातिमा सना शेख, सान्या मल्होत्रा आणि पंकज त्रिपाठी हे कलाकार झळकणार आहेत. तगडी स्टारकास्ट आणि उत्तम दिग्दर्शक यांच्या जोरावर हा चित्रपट सिनेमागृह गाजवेल, यात काही शंका नाही.
या चित्रपटाची निर्मिताी भूषण कुमार, दिव्या खोसला कुमार, क्रिशन कुमार, अनुराग बासु आणि पत्नी तानी बासु हे करणार आहेत. चित्रपट व्यापार विश्लेषक तरण आदर्श यांनी ट्विट शेअर करत याबद्दलची माहिती दिली आहे. पुढील वर्षी २४ जानेवारीला चित्रपट प्रेक्षकांची मने जिंकण्यास सज्ज झाला आहे.