ETV Bharat / sitara

नेहमीच मोदी सरकारविरोधात भूमिका घेत आलेत अनुराग आणि तापसी - अनुराग कश्यप यांचे ट्विट

दिग्दर्शक अनुराग कश्यप आणि अभिनेत्री तापसी पन्नू हिच्या घरी आयकर विभागाने छापा टाकला आहे. या दोघांनीही नेहमीच मोदी सरकारच्या विरोधात भूमिका घेतल्यामुळे ही सुडबुध्दीने कारवाई झाल्याची सध्या चर्चा आहे. आजवर त्यांनी घेतलेल्या भूमिकांवर एक नजर टाकूयात.

Anurag and Tapasi
अनुराग आणि तापसी
author img

By

Published : Mar 4, 2021, 2:42 PM IST

Updated : Mar 4, 2021, 5:07 PM IST

मुंबई - बॉलिवूड निर्माता दिग्दर्शक अनुराग कश्यप आणि अभिनेत्री तापसी पन्नू हिच्या घरी आयकर विभागाने छापा टाकला आहे. सलग अकरा तास चौकशी केल्यानंतर अनुरागच्या घराीतून त्याचा मोबाईल, लॅपटॉप व बँकेची काही कागदपत्रे घेऊन आयकर कर्मचारी बाहेर पडले आहेत. अनुराग आणि तापसीच्या घरी पडलेल्या या छाप्यामुळे राजकारणही तापत चालले आहे. दोघांनीही नेहमीच आपली राजकिय मते सोशल मीडियवावरुन व्यक्त केली आहेत.

प्राप्तिकराच्या या धाडीवरून राजकीय गोंधळ उडाला आहे. विरोधी पक्ष नेते यास मोदी सरकारची सूड उगवणारी कारवाई म्हणून संबोधत आहेत. कॉंग्रेस नेते अशोक चव्हाण यांनी अनुराग आणि तापसी यांच्यावर प्राप्तिकर विभागाने टाकलेले छापे मोदी सरकारचा सूड असल्याचे म्हटले आहे. त्याचवेळी, शिवसेनेच्या खासदार प्रियंका चतुर्वेदी यांनी ट्वीटमध्ये लिहिले, की आपल्या देशातील आयकर विभाग लवकरच गुलामगिरीच्या परिस्थितीतून बाहेर येईल, अशी अपेक्षा आहे.

मोदी सरकाराच्या विरोधात तापसी आणि अनुराग यांची भूमिका

शेतकरी आंदोलनाचा किंवा सीएएचा प्रश्न असो वा तापसी पन्नू आणि अनुराग कश्यप यांनी सरकारवर उघडपणे हल्ला बोल केला आहे. पॉप स्टार रिहाना हिने शेतकरी आंदोलनाच्या बाजूने ट्विट केले तेव्हा बॉलिवूडच्या अनेक स्टार्सने एकतेचा संदेश दिला, तेव्हा तापसी हिने ट्विटरवर अएशा कलाकारांच्याविरूद्ध युद्ध पुकारले होते. त्यावेळी अनुराग कश्यपही उघडपणे सरकारविरोधात उतरले होते.

Tapasi Pannu's tweet
तापसी पन्नूचे ट्विट

तापसीने लिहिले- 'जर एखादे ट्विट तुमची एकता हलवू शकते तर तुम्हाला तुमच्या भावना बळकट करण्याची गरज आहे. प्रचारा बद्दल इतरांना शिकवण्याची गरज नाही.

त्याच वेळी, तापसी यांनी 14 फेब्रुवारी 2021 रोजी सरकारवर कडक शब्दांत लिहिले - 'तुम्ही फक्त एखाद्याला घाबरून एखाद्याचा द्वेष करू शकता, प्रेम नाही'.

15 सप्टेंबर 2020 रोजी, तापसींनी लिहिले - देशाच्या हितासाठी प्रश्न विचारणे हे देशाच्या विरोधात नाही. सप्टेंबर महिन्यातच, तापसी म्हणाली होते की आपण चित्रपटसृष्टीमुळे असे झाले की लोक तुमचे ऐकतात आणि आपण लोकांचे हिरो बनता. मी बरोबर म्हटले आहे की आपण ज्या प्लेटमध्ये जेवत आहात त्या प्लेटमध्ये छिद्र करीत आहात.

याशिवाय जेव्हा पंतप्रधान मोदींनी संपूर्ण देशाला दिवे बंद करुन पणत्या व मेणबत्ती लावावीत असे आवाहन केले होते. कोरोनाविरूद्ध सुरू असलेल्या युद्धामध्ये त्यांनी संपूर्ण देशाला एकत्र करण्यासाठी हे सांगितले होते, त्यावेळी अभिनेत्री तपसीने निशाणा साधताना म्हटले होते की, 'आणखी एक टास्क मिळाला.'

लोकांची देशद्रोही आणि देशभक्त अशी विभागणी

जानेवारी 2020 मध्ये, अनुराग यांनी लिहिले - 'हे सरकार मुके आहे, यांच्याकडे कोणतीही योजना नाही. धमकी देण्याशिवाय कोणतीही कोणतीही दृष्टी नाही. अनुराग म्हणाले होते- 'त्यांनी फक्त प्रश्नांमुळे शत्रू बनवायला सुरुवात केली आहे. त्यांना प्रश्न आवडत नाही. त्यांनी देशाचे दोन तुकडे केले आहेत. एक देशद्रोही आणि एक देशभक्त. जे प्रश्न विचारतात ते देशद्रोही आहेत आणि जे मोदींचे भक्त आहेत ते देशभक्त आहेत.

Anurag Kashyap's tweet
अनुराग कश्यप यांचे ट्विट

शाहीन बागेत अनुराग कश्यपची हजेरी

याशिवाय शाहीन बागेत नागरिकता दुरुस्ती कायदा (सीएए) आणि राष्ट्रीय नागरिकत्व नोंदणी (एनआरसी) च्या निषेधासाठी अनुराग कश्यप यांनीही हजेरी लावली होती. यावेळी अनुराग कश्यप यांनीही व्यासपीठावर भाषण केले होते.

यावेळी अनुराग म्हणाले होते - जेव्हा तुम्ही तुमच्या हक्कांसाठी लढा देता तेव्हा तुम्ही सत्यासाठी ठाम रहा. त्यांना ताकदीचा वापर करुन येथून काढून टाकण्याची कोणतीही संधी देऊ नका. मोदी सरकारवर हल्ला चढवत अनुराग म्हणाले की, त्यांना प्रेमाची भाषा समजत नाही. सीएएबाबत सरकारने जे दावे केले आहेत त्यावर वयैक्तीक पातळीवर त्यांनाही विश्वास बसणार नाही.

फॅन्टम फिल्म्सशी संबंधित छापा

Anurag Kashyap's tweet
अनुराग कश्यप यांचे ट्विट

अनुराग कश्यप, तापसी पन्नूशिवाय विकास बहल आणि मधु मन्तेनाच्या ठिकाणांरही आयटी विभागाने छापे टाकले आहेत. मधु मॅन्टेनाची टॅलेंट मॅनेजमेंट कंपनी क्वानच्या कार्यालयावरही छापा टाकण्यात आलाय. फॅन्टम चित्रपटाच्या कर चुकवण्याच्या संदर्भात हा छापा टाकण्यात आल्याचं सांगण्यात येत आहे. इतर अनेक लोकांवरही फॅन्टम चित्रपटांद्वारे कर चुकवण्याच्या संदर्भात चौकशी केली जात आहे.

केव्हा बनली होती फॅन्टम फिल्म कंपनी?

2011 मध्ये अनुराग कश्यप, मधु मन्तेना, विक्रमादित्य मोटवानी आणि विकास बहल यांनी फॅन्टम ही कंपनी तयार केली. या कंपनीच्यावतीने काही गाजलेले चित्रपट बनले तर काही सिनेमांना बॉक्स ऑफिसवर अपयशही आले होते. तथापि, फॅन्टम फिल्म्स ऑक्टोबर 2018 मध्ये बंद करण्यात आली आहे.

Last Updated : Mar 4, 2021, 5:07 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.