ETV Bharat / sitara

अनुपम खेर यांना बॉलिवूडमध्ये 36 वर्षे पूर्ण, 'सारांश'मधून केले होते पदार्पण - अभिनेता अनुपम खेर

महेश भट्ट यांच्या सारांश चित्रपटाला आज 36 वर्षं पूर्ण झाली आहेत. अनुपम खेर यांचा हा पदार्पणाचा चित्रपट होता. त्यामुळे त्यांच्या अभिनय कारकिर्दिलाही 36 वर्षं पूर्ण झाली आहेत. याबद्दल खेर यांनी सर्वांचे आभार मानले आहेत.

Anupam completes 36 years in Bollywood
सारांश चित्रपटाला आज ३६ वर्ष पूर्ण
author img

By

Published : May 25, 2020, 4:09 PM IST

मुंबई - दिग्गज अभिनेता अनुपम खेर यांच्या पदार्पणाच्या 'सारांश' चित्रपटाला 36 वर्षं पूर्ण झाली आहेत. यानिमित्ताने अनुपम यांनी ट्विटरवर सारांशचे काही फोटो शेअर केले आहेत. या चित्रपटावर आणि त्याच्या अभिनयावर प्रेम करणाऱ्या सर्वांचे आभार मानले आहेत.

''माझा पहिला चित्रपट सरांश २५ मे १९८४ रोजी रिलीज झाला होता. मी मनोरंजनाच्या जगात 36 वर्ष पूर्ण केली आहेत. हा एक अविस्मरणिय प्रवास होता. परमेश्वर दयाळू आहे आणि तुम्ही प्रेक्षक म्हणून माझ्यावर भरपूर प्रेम केले. आभारी आहे.!! #36YearsOfAnupam #KuchBhiHoSaktaHai," असे अनुपम यांनी म्हटले आहे.

यापूर्वी, सारांशचे दिग्दर्शक महेश भट्ट यांनी अनुपम खेर यांच्या अभिनय कौशल्याचे कौतुक केले आहे. सारांश चित्रपटाला 36 वर्षे पूर्ण झाल्याचा आनंद भट्ट यांनी व्यक्त केला आहे. या चित्रपटाच्यावेळी अनुपम खेर 28 वर्षांचे होते. मुलगा मरण पावलेल्या शिक्षकाची भूमिका त्यांनी उत्तम साकारल्याचे महेश भट्ट याना सोशल मीडियावर सांगत त्यांचे कौतुक केले आहे.

अनुपम खेर यांनी महेश भट्ट यांच्या ट्विटरला उत्तर देत त्यांचे आभार मानले आहेत. या चित्रपटामुळे आपले आयुष्य बदलल्याचे खेर यांनी म्हटले आहे. सारांश चित्रपटासाठी अनुपम खेर यांना फिल्मफेअरचे सर्वोत्कृष्ट कलाकाराचे पहिले अवॉर्ड मिळाले होते. महेश भट्ट यांनी दिग्दर्शित केलेल्या सारांश चित्रपटात सोनी राझदान आणि रोहिणी हट्टंगडी यांच्याही भूमिका होत्या.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.