ETV Bharat / sitara

''असहिष्णुतेच्या मुद्द्यावर योग्य होते आमिर आणि शाहरुख''

पाच वर्षापूर्वी आमिर खान आणि शाहरुख खानने असहिष्णुतेच्या मुद्द्यावर व्यक्त केलेली मते योग्यच होती, असे मत दिग्दर्शक अनुभव सिन्हा यांनी व्यक्त केले आहे.

Anubhav Sinha on comment  about intolerance
दिग्दर्शक अनुभव सिन्हा
author img

By

Published : Jan 7, 2020, 7:28 PM IST

मुंबई - 'आर्टिकल 15'या चित्रपटामुळे चर्चेत असलेले दिग्दर्शक अनुभव सिन्हा यांनी आमिर आणि शाहरुख खान यांच्या विचारांची पाठराखण केली आहे. असहिषणुतेच्या मुद्द्यावर आमिर आणि शाहरुखने पाच वर्षापूर्वी आपली मते बोलून दाखवली होती. त्यानंतर त्यांना प्रचंड विरोधाला सामोरे जावे लागले होते.

अनुभव सिन्हाने ट्विट करीत म्हटलंय, ''आठवत असेल तर ५ वर्षापूर्वी भारताच्या दोन सुपरस्टार्सनी एक शब्द वापरला होता आणि त्याला प्रचंड विरोध झाला होता. त्यांच्या पाठीशी कोणीही उभे राहिले नव्हते. ते स्टार्स दुसरे तिसरे कोणी नव्हते... ते आमिर खान आणि शाहरुख खान होते. शब्द होता असहिष्णुता आणि तो अतिशय योग्य होता.''

देशात वाढत चाललेल्या असहिष्णुतेच्या संस्कृतीबाबत २०१५ ला आमिर खान आणि शाहरुख खानने भाष्य केले होते. सर्व प्रकारच्या असहिष्णुतेसह धार्मिक असहिष्णुतेबाबातही संकेत दिले होते.

आमिरने एक इव्हेन्टमध्ये म्हटले होते, ''जेव्हा मी घरी किरणसोबत बोलत होतो तेव्हा ती म्हणाली, आपण भारत सोडायचा का? किरणने हे खूप मोठे विधान केले होते. तिला आपल्या मुलांबद्दल काळजी वाटत होती. ती आमच्या आजुबाजूचे वातावरण आणि होणाऱ्या वातावरणाबद्दल चिंतीत आहे. तिला रोज वर्तमानपत्र उघडण्याची भिती वाटते.''

शाहरुखने एका टीव्ही चॅनलशी बोलताना म्हटले होते, ''इथे असहिष्णुता आहे...खूप जास्त असहिष्णुता आहे...माझं म्हणणे आहे की असहिष्णुता वाढत आहे. असहिष्णु असणे सर्वात मोठा मुर्खपणा आहे आणि आपल्या देशाचा सर्वात मोठा मुद्दा आहे. केवळ मुद्दा नाही तर या देशाचा देशभक्त होण्याच्या नात्याने धर्मनिरपेक्षता असताना धर्मिक असहिष्णु असणे सर्वात वाईट गुन्हा आहे.''

रिपोर्टनुसार त्यावेळी पुरस्कार परत करण्याच्या मोहिमेच्या पार्श्वभूमीवर शाहरुखचे विधान प्रसिध्द झाले होते.

त्यांच्या या विधाननंतर शाहरुख आणि आमिरला प्रचंड टीकेला सामोरे जावे लागले होते. आपले विधान चुकीच्या पध्दतीने घेतल्याचा दावा शाहरुखने त्यावेळी केला होता.

Intro:Body:Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.