मुंबई - बॉलिवूडचा सुपरस्टार सलमान खानने 'अंतिम' चित्रपटाची पहिली झलक शेअर केली आहे. यात तो आपला मेव्हणा आयुष शर्मासोबत पहिल्यांदाच स्क्रिन स्पेस शेअर करणार आहे.
सलमानने आपल्या इन्स्टाग्रामवर एक व्हिडिओ झलक शेअर केली आहे. यात आयुष शर्मा सलमानच्या दिशेने धावत येत असताना दिसतो. आयुषचा आक्रमक लूक यात पाहायला मिळतो. सलमान आणि आयुषची जबरदस्त फाईटचा हा व्हिडिओ आहे. अशा प्रकारे सलमानने आपला आणि मेव्हण्याचा या चित्रपटातील फर्स्ट लूक शेअर केला आहे.
'अंतिम' हा २०१८ मध्ये रिलीज झालेल्या मराठी चित्रपट 'मुळशी पॅटर्न'चा रिमेक आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन निर्माते प्रवीण तरडे यांनी केले होते, तर या रिमेकचे दिग्दर्शन अभिनेता-चित्रपट निर्माते महेश मांजरेकर करणार आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार आयुष शर्मा यात कुख्यात गुंडाची भूमिका साकारत असून सलमान यात शीख शिपायाची भूमिका करताना दिसणार आहे. या चित्रपटाचे शुटिंग पुण्यात १६ नोव्हेंबरला सुरू झाले आहे. पहिल्या शेड्यूलमध्ये काही पाठलागाचे सीन्स पुण्यात आणि कर्जतमध्ये शुट करण्यात आले आहेत. अभिनेता निकितिन धीर हादेखील या चित्रपटात गुंडाची भूमिका करणार आहे.
हेही वाचा -
दरम्यान, ५४ वर्षीय अभिनेता सलमान खान आगामी 'राधे - युवर मोस्ट वॉन्टेड भाई' या मोठ्या पडद्यावर दिसणार आहे. प्रभुदेवा दिग्दर्शित या चित्रपटाचे शुट ऑक्टोबरमध्ये पूर्ण झाले होते. यापूर्वी दिशा पाटनी आणि रणदीप हूडा यांनी अभिनय केलेला 'राधे' हा चित्रपट यापूर्वी २२ मे रोजी थिएटरमध्ये दाखल होणार होता पण कोरोना व्हायरस साथीच्या आजारामुळे त्याला उशीर झाला आहे.