ETV Bharat / sitara

अनिल कपूर घेतोय जर्मनीत उपचार, व्हिडिओ शेअर केल्याने चाहत्यांमध्ये संभ्रम - डॉ. मुल्लर यांच्या भेटीला अनिल कपूर

अभिनेता अनिल कपूर याने नुकताच एक व्हिडीओ शेअर केला आहे. त्यामुळे त्याच्या चाहत्यांना अनिल कपूरच्या तब्येतीबद्दल चिंता लागली आहे. अनिल कपूरने हा व्हिडीओ जर्मनीमधून शेअर केला आहे.

अनिल कपूर घेतोय जर्मनीत उपचार
अनिल कपूर घेतोय जर्मनीत उपचार
author img

By

Published : Nov 27, 2021, 7:53 PM IST

बॉलिवूडमधील सदाबहार अभिनेता अनिल कपूर याने नुकताच एक व्हिडीओ शेअर केला आहे. त्यामुळे त्याच्या चाहत्यांना अनिल कपूरच्या तब्येतीबद्दल चिंता वाटू लागली आहे. अनिल कपूरने हा व्हिडीओ जर्मनीमधून शेअर केला आहे.

त्यात तो जर्मनीतील बर्फ पडत असलेल्या रस्त्यांवरून काळा कोट, कॅप घालून चालताना दिसतो आहे. कॅप्शनमध्ये अनिलने, "जर्मनीत स्नोवर एक परफेक्ट वॉक असे लिहून त्याखाली जर्मनीतील शेवटचा दिवस, डॉ. मुल्लर यांच्या भेटीला चाललो आहे. त्यांच्या जादूई स्पर्शाबद्दल आभारी आहे, असे म्हटले आहे."

कोणता आजार, कसली ट्रीटमेंट याचा काहीच उल्लेख नसल्याने अनिल कपूरचे चाहते चिंतेत पडले आहेत. आजार फार गंभीर नाही ना या काळजीने त्यांना व्यापले आहे. सोशल मिडीयावर अनिल कपूरला नक्की काय झाले याची विचारणा होत आहे. सर्वसाधारणपणे आजार गंभीर असेल तरच परदेशात उपचार केले जातात, म्हणून ही चौकशी होत आहे.

२०१९ मध्ये अनिल उजव्या खांद्याच्या दुखण्याने हैराण होता. तेव्हाही त्याने जर्मनीत डॉ. हॅन्स मुल्लर यांच्या कडेच उपचार घेतले होते. मुल्लर सेलेब्रिटी स्पोर्ट्स डॉक्टर असून ते सध्या जर्मनीच्या फुटबॉल टीम बरोबर काम करत आहेत. त्यांच्या क्लायंटमध्ये धावपटू उसेन बोल्ट, टेनिस खेळाडू बोरिस बेकर यांची नावे आहेत.

हेही वाचा - बॉलिवूडची क्वीन दीपिका पदुकोणने शकुन बत्राच्या चित्रपटासाठी डबिंग केले सुरू!

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.