मुंबई - अनीस बझ्मी यांच्या 'पागलपंती' चित्रपटाच्या पहिल्या शेड्यूलचं चित्रीकरण पूर्ण झालं आहे. हैदराबादमध्ये हे चित्रीकरण केलं गेलं. बझ्मींनी चित्रपटाच्या टीमसोबतचे काही फोटो शेअर करत याबद्दलची माहिती दिली आहे. सोबतच सर्वांचं कौतुकही केलं आहे.
पूर्ण स्टारकास्ट आणि टीमचं जितकं कौतुक करेल, ते कमीच आहे. वेळ कसा निघून गेला समजलंच नाही. हसत खेळत आम्ही ५ दिवस आधीच चित्रीकरण पूर्ण केलं, असं बझ्मींनी आपल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे. तर त्यांची हीच पोस्ट शेअर कर पुलकीत सम्राट म्हणाला, काय शेड्यूल होतं, काय अनुभव होता, काय टीम होती...टीमसोबतचा प्रत्येक दिवस आमच्या पागलपंतीमध्ये गेला.
-
And it's a schedule wrap for #Pagalpanti in Hyderabad... Poore cast & crew ki jitni bhi tareef karu kam hai. Waqt kaise nikal gaya pata hi nahi chala. Aur haste khelte humne shooting 5 din pehle hi khatam kar di 😄@kriti_official @PulkitSamrat pic.twitter.com/a9WlETTSxk
— Anees Bazmee (@BazmeeAnees) August 1, 2019 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">And it's a schedule wrap for #Pagalpanti in Hyderabad... Poore cast & crew ki jitni bhi tareef karu kam hai. Waqt kaise nikal gaya pata hi nahi chala. Aur haste khelte humne shooting 5 din pehle hi khatam kar di 😄@kriti_official @PulkitSamrat pic.twitter.com/a9WlETTSxk
— Anees Bazmee (@BazmeeAnees) August 1, 2019And it's a schedule wrap for #Pagalpanti in Hyderabad... Poore cast & crew ki jitni bhi tareef karu kam hai. Waqt kaise nikal gaya pata hi nahi chala. Aur haste khelte humne shooting 5 din pehle hi khatam kar di 😄@kriti_official @PulkitSamrat pic.twitter.com/a9WlETTSxk
— Anees Bazmee (@BazmeeAnees) August 1, 2019
दरम्यान अनिस बझ्मींचं दिग्दर्शन असलेल्या या चित्रपटात पुलकीत सम्राट, क्रिती खरबंदा, अनिल कपूर, जॉन अब्राहम, इलियाना डिक्रूझ, अर्शद वारसी यांच्या महत्त्वाच्या भूमिका आहेत. हा सिनेमा येत्या २२ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.