मुंबई - महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता यांनी गायिका म्हणून स्वत:ची वेगळी ओळख निर्माण केली आहे. त्यांच्या गायनाची आवड ही नेहमीच पाहायला मिळते. बऱ्याच गाण्यांना त्यांनी आवाज दिला आहे. आता त्यांचे नवे गाणे 'अलग ये मेरा रंग है' हे गाणं सोशल मीडियावर प्रदर्शित करण्यात आले आहे. महिला दिनानिमित्त हे गाणे तयार करण्यात आले आहे. या गाण्याला अवघ्या काही तासातच २ मिलियन पेक्षा अधिक व्हिव्ज मिळाले आहेत.
या गाण्यातून अॅसिड हल्ला पीडितांवर प्रकाश टाकण्यात आला आहे. अॅसिड हल्यानंतर एक स्त्री तिचे सौंदर्यच नाही, तर स्वत:चा आत्मविश्वासही गमावते. मात्र, या गाण्यातून अशा स्त्रियांच्या स्वप्नांना पुन्हा बळ देण्याचा प्रयत्न केला गेला आहे. अॅसिड हल्ला करणारा आपला चेहरा बदलवू शकतो मात्र, आपला आत्मा नाही, असा संदेश या गाण्यातून देण्यात आला आहे.
- " class="align-text-top noRightClick twitterSection" data="">
हेही वाचा -महिला दिनानिमित्त प्रार्थना बेहरेचा हटके लुक, सोशल मीडियावर फोटो व्हायरल
अमृता फडणवीस यांच्या आवाजाचेही नेटकऱ्यांनी कौतुक केले आहे. विजय सिंघल आणि आरती सिंघल यांनी या गाण्याची निर्मिती केली आहे. डोनाल बिस्ट या अभिनेत्रीवर हे गाणे चित्रीत करण्यात आले आहे. तर, अमृता फडणवीस यांचीही झलक या गाण्यात पाहायला मिळते.
अभिजीत जोशी यांनी या गाण्याला शब्दबद्ध केले आहे. तर, राजीव वालियाने या गाण्याला कोरिओग्राफ केले आहे.
हेही वाचा -आंतरराष्ट्रीय महिला दिवस : बॉलिवूड कलाकारांनी दिल्या शुभेच्छा