ETV Bharat / sitara

अमिताभ बच्चनचा लक्षवेधी ‘चेहरा’, ‘चेहरे’ च्या पोस्टरवर! - ‘चेहरे’ च्या पोस्टरवरअमिताभ बच्चन

‘चेहरे’ चित्रपटात अमिताभ बच्चन एका महत्वपूर्ण भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटाचा टिझर प्रदर्शित झाला जो प्रेक्षकांना खूप आवडला आणि आता चित्रपटाच्या ट्रेलर येत्या १८ मार्चला प्रदर्शित होईल.

amitabh bachchan
अमिताभ बच्चन
author img

By

Published : Mar 15, 2021, 5:38 PM IST

मुंबई - आनंद पंडित निर्मित ‘चेहरे’ चित्रपटात अमिताभ बच्चन एका महत्वपूर्ण भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटाचा टिझर प्रदर्शित झाला जो प्रेक्षकांना खूप आवडला आणि आता चित्रपटाच्या ट्रेलरचा ‘इंतजार हैं’ जो येत्या १८ मार्चला प्रदर्शित होईल. या दरम्यान निर्मात्यांनी एक आकर्षक सोलो पोस्टर प्रकाशित केले आहे ज्यात अमिताभ बच्चनचा लक्षवेधी ‘चेहरा’, ‘चेहरे’ च्या पोस्टरवर लक्ष वेधून घेत आहे. रुमी जाफरी दिग्दर्शित या चित्रपटामध्ये इम्रान हाश्मी देखील मुख्य भूमिकेत दिसेल.

amitabh bachchan
‘चेहरे’ च्या पोस्टरवर अमिताभ
‘चेहरे’ चित्रपटातील अमिताभ बच्चन या मेगास्टारचा फॅशनेबल आणि चेहऱ्यावरील चलाखी प्रेरित करणाऱ्या लूकबद्दल बरीच चर्चा झालीय. जरी चित्रपटाच्या आशयाबद्दल वा कथानकाबद्दल गुप्तता बाळगण्यात आली असली तरी बिग बी आणि इम्रान हाश्मी यांची अभिनय-जुगलबंदी अनुभवायला प्रेक्षक उत्सुक आहेत. हे दोघेही सुपरस्टार्स पहिल्यांदाच एकत्र आले आहेत. त्यातच अमिताभ बच्चन यांचा यावर्षी प्रदर्शित होणारा ‘चेहरे’ हा पहिलाच चित्रपट असेल त्यामुळेही या सिनेमाबाबतची, प्रेक्षकांची आणि त्यांच्या चित्रपटसृष्टीतील सहकाऱ्यांची,उत्सुकता वाढलेली आहे. आनंद पंडित मोशन पिक्चर्स आणि सरस्वती एंटरटेनमेंट प्रायव्हेट लिमिटेड निर्मित, रुमी जाफरी दिग्दर्शित ‘चेहरे’ या चित्रपटात अन्नू कपूर, क्रिस्टल डिसोजा, धृतिमान चटर्जी, रघुबीर यादव आणि सिद्धांत कपूर यांच्याही महत्वपूर्ण भूमिका आहेत. ‘चेहरे’, हा चित्रपट, आता ९ एप्रिल २०२१ रोजी चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होण्यास सज्ज झालेला आहे.

हेही वाचा - मिस वर्ल्ड’ भारतीय हॉलिवूड स्टार प्रियांका चोप्रा जोनास अनेक गोष्टींमध्ये पारंगत

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.