ETV Bharat / sitara

ट्विटरवर 'बिग बीं'नी दाखवली त्यांच्या तीन पिढ्यांची झलक - अमिताभ बच्चन लेटेस्ट अपडेट

यापूर्वी बच्चन यांनी त्यांच्या दिवंगत आई तेजी बच्चन यांचे स्मरण करणारा एक जुना फोटो सोशल मीडियावर शेअर केला होता. इन्स्टाग्रामवर शेअर केलेल्या या जुन्या मोनोक्रोम फोटोमध्ये बच्चन हे त्यांची आई आणि भाऊ अजिताभसोबत दिसले होते.

अमिताभ बच्चन
अमिताभ बच्चन
author img

By

Published : Dec 27, 2020, 5:02 PM IST

मुंबई - बॉलिवूड सुपरस्टार, महानायक अमिताभ बच्चन यांनी आपल्या कुटुंबातील तीन पिढ्यांचा एक फोटो सोशल मीडियावर चाहत्यांसाठी शेअर केला आहे. या छायाचित्रात अमिताभ बच्चन आपले आजोबा खजनसिंह सुरी आणि मुलगा अभिषेकसोबत दिसत आहेत. पगडीसह हे सर्व या चित्रात दिसत आहेत.

तीन पिढ्यांची झलक
तीन पिढ्यांची झलक

आपल्या फोटो पोस्टच्या कॅप्शनमध्ये त्यांनी लिहिले आहे की, "आजोबा .. नातू .. पणतू."

यापूर्वी बच्चन यांनी त्यांच्या दिवंगत आई तेजी बच्चन यांचे स्मरण करणारा एक जुना फोटो सोशल मीडियावर शेअर केला होता. इन्स्टाग्रामवर शेअर केलेल्या या जुन्या मोनोक्रोम फोटोमध्ये बच्चन हे त्यांची आई आणि भाऊ अजिताभसोबत दिसले होते.

चित्रपटांविषयी बोलायचे झाले तर, यंदाचे वर्ष त्यांच्यासाठी खूपच व्यग्र राहणार आहे. कारण या काळात त्यांचे बरेच चित्रपट येत आहेत. येत्या काही वर्षांत बच्चन इम्रान हाश्मीच्या 'फेस' मध्ये, नागराज मंजुळेंच्या 'झुंड', अयान मुखर्जींच्या 'ब्रह्मास्त्र' चित्रपटात दिसणार आहेत. याशिवाय यावर्षी त्यांचा ‘मेडे’ हा चित्रपटही येत आहे, या चित्रपटात अजय देवगण आणि रकुल प्रीत सिंग यांच्यासह कलाकार असतील. दीपिका पदुकोण आणि प्रभास यांच्यासह ते आणखी एका चित्रपटाचा भाग आहेत, त्याच्या शीर्षकाबाबत चर्चा अजून बाकी आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.