ETV Bharat / sitara

Lockdown : बिग बींनी शेअर केला मजेशीर विनोद, पाहा पोस्ट

author img

By

Published : Apr 18, 2020, 12:12 PM IST

सध्या कोरोना विषाणूमुळे सर्व नागरिक त्रस्त झाले आहेत. लॉकडाऊन आणखी वाढल्याने नागरिक घरी बसून कंटाळले आहेत. त्यामुळे बिग बींनी लॉकडाऊनवर आधारित एक विनोद शेअर केला आहे.

Amitabh bachchan shares jokes on lockdown
बिग बींनी शेअर केला मजेशीर विनोद, पाहा पोस्ट

मुंबई - महानायक अमिताभ बच्चन हे सोशल मीडियावर बऱ्यापैकी सक्रिय असतात. ते नेहमी प्रेक्षकांच्या मनोरंजनासाठी काही ना काही शेअर करत असतात. सध्या कोरोना विषाणूमुळे सर्व नागरिक त्रस्त झाले आहेत. लॉकडाऊन आणखी वाढल्याने नागरिक घरी बसून कंटाळले आहेत. त्यामुळे बिग बींनी लॉकडाऊनवर आधारित एक विनोद शेअर केला आहे.

अमिताभ बच्चन यांनी एक मजेशीर फोटो शेअर करून विनोद सांगितला आहे. त्यांनी आपल्या पोस्टमध्ये लिहिलेय, की 'आता तर घरी कोणाचा फोन आला तर आपण सांगूही शकत नाही, की साहेब घरी नाहीत'. बऱ्याचदा घरी कोणाचे ना कोणाचे फोन सुरू असतात. त्यामुळे कधीकधी आपण देखील साहेब घरी नाहीत, असे सांगून मोकळे होतो. मात्र, लॉकडाऊन सुरू असल्याने सर्व घरीच असल्याने आता तो पर्याय देखील उरलेला नाही, असे बिग बींनी आपल्या विनोदातून म्हटले आहे.

अलिकडेच त्यांनी आपल्या जुन्या आठणींना देखील उजाळा दिला आहे. 'शोले' चित्रपटाच्या प्रिमिअर दरम्यानचा एक फोटो त्यांनी शेअर केला आहे. यामध्ये त्यांची आई तेजी बच्चन, वडील हरिवंशराय बच्चन आणि पत्नी जया यांची झलक पाहायला मिळते.

  • T 3405 - .... अच्छा , एक और बात तय है , इन दिनों ... जब फ़ोन आए , तो ये भी नहीं कहा जा सकता की ' साहेब घर में नहीं है ' !!!😜 pic.twitter.com/NisaBoIO6p

    — Amitabh Bachchan (@SrBachchan) April 17, 2020 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

लॉकडाऊन दरम्यान बिग बींनी नागरिकांना व्हिडिओद्वारे खबरदारी बाळगण्याचे आवाहन देखील केले आहे. तसेच त्यांनी घरीच बसून फॅमिली ही शॉर्ट फिल्म देखील शूट केली होती. या शॉर्टफिल्ममध्ये आलिया भट्ट, रणबीर कपूर, दलजीत दोसांझ, रजनीकांत, प्रियांका चोप्रा यांसारख्या कलाकारांनी देखील घरीच बसून सहभाग घेतला होता. या शॉर्टफिल्ममधून जो निधी जमा झाला, ती कोरोनाच्या लढाईसाठी आर्थिक मदत म्हणून देण्यात येणार आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.