ETV Bharat / sitara

कोरोनाने तुझा मृत्यू व्हावा.. हेटर्सच्या वाक्याने भडकले अमिताभ बच्चन, म्हणाले.. - मला आशा आहे की तुम्ही मराल

ज्येष्ठ अभिनेता अमिताभ बच्चन सध्या नानावटी रुग्णालयात कोरोना व्हायरसशी झुंज देत आहेत. त्यांच्या तब्येतीबद्दल शुभेच्छा देत इंटरनेटवर ट्रोलर्सनी त्यांना 'मला आशा आहे की तुम्ही मराल' असे म्हटले होते. बच्चन यांनी आपल्या ब्लॉगवरुन त्या ट्रोलर्सला चोख प्रत्युत्तर देताना म्हटलंय की, 'ठोंक दो सालो को'.

Amitabh Bachchan
ट्रोलर्सवर भडकले बच्चन
author img

By

Published : Jul 28, 2020, 8:01 PM IST

मुंबई - अमिताभ बच्चन यांना ट्रोल करणाऱ्या युजरला त्यांनी कडक शब्दात उत्तर दिले आहे. मुंबईच्या रुग्णालयातून त्यांनी एक ब्लॉग लिहिला असून त्यांनी खूप भावनिक गोष्टीही लिहिल्या आहेत.

कोरोना व्हायरसमुळे त्यांचा मृत्यू व्हावा अशी आशा बाळगणाऱ्या त्या अज्ञात ट्रोलर्सबद्दल बच्चन लिहितात, "ते लिहून मला सांगतात, 'मला आशा आहे की आपण या कोव्हिडमुळे मरणार आहात'".

  • T 3607 - T 3607 - अपनी छोटी बिटिया , और बहुरानी को ,अस्पताल से मुक्ति मिलने पर ; मैं रोक ना पाया अपने आंसू 🙏
    प्रभु तेरी कृपा अपार , अपरम्पार 🙏🙏

    — Amitabh Bachchan (@SrBachchan) July 27, 2020 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

"अहो, मिस्टर अनामिक, तुम्ही तुमच्या वडिलांचे नावसुध्दा लिहिलेले नाही..कारण तुमचे वडिल कोण आहेत हे माहिती नसणार...दोन गोष्टी घडू शकतात... एक तर मी मरू शकतो किंवा जगू शकतो. जर माझा मृत्यू झाला तर तुला सेलेब्रिटीच्या नावावर आपली टिप्पणी करण्यासाठी जबदस्तीने लिहिण्यास मिळणार नाही.", असे बच्चन यांनी लिहिलंय.

''तुमच्या लिखाणाकडे लक्ष देण्याचे कारण म्हणजे तू अमिताभ बच्चन यांना चापट मारली आहेस...आता ते फार काळ अस्तित्वात राहणार नाही...जर देवाच्या कृपेने मी जगलो तर तुला वादळ सहन करावे लागेल. फक्त माझ्याकडूनच नाही तर ९० दशलक्ष फॉलोअर्स कडून अत्यंत कडवेपणाने.'',असे बच्चन यांनी पुढे म्हटलंय.

"मी त्यांना अजून सांगितलेले नाही... परंतु जर मी जगलो तर मी राहीन ... आणि मी तुला सांगतो की त्यांच्यात एक शक्ती आहे...त्यांनी संपूर्ण जगाला मागे टाकलंय..पश्चिमेकडून पूर्वेपर्यंत आणि उत्तरेकडून दक्षिणेपर्यंत. ते केवळ या पेजचे फॉलोअर्स नाहीत..या विस्तारित परिवाराच्या डोळ्यातील ठिणगीने संहार होईल. मी त्यांना फक्त एवढेच सांगेन..'ठोक दो सालो को','' असे बच्चन यांनी म्हटलंय.

हेही वाचा - 'गेम ऑफ थ्रोन्स' स्टार सोफी टर्नर आणि जो जोनास यांना कन्यारत्न

अमिताभ बच्चन यांची नात आराध्या आणि सून ऐश्वर्या यांची कोरोना चाचणी निगेटिव्ह आल्यामुळे त्यांना डिस्चार्ज मिळाला आहे. यानंतर त्यांनी एक भावनिक पोस्ट लिहिली आहे. त्यांच्या डिस्चार्जच्यावेळी बच्चन यांना रडू कोसळले होते. याबद्दल त्यांनी आपल्या ट्विटमध्येही लिहिले आहे.

सध्या अमिताभ आणि त्याचा मुलगा अभिषेक यांच्यावर मुंबईतील नानावटी रुग्णालयात कोविड -१९ चा उपचार सुरू आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.