ETV Bharat / sitara

..म्हणून अमिताभ नाही घेऊ शकले चाहत्यांची भेट, ट्विट करत दिली माहिती - jalsa

प्रत्येक रविवारी ते यासाठीचा वेळ निश्चित करत असतात. मात्र, या रविवारी त्यांच्या चाहत्यांची निराशा झाली. कारण, अमिताभ चाहत्यांना भेटण्यासाठी जलसाबाहेर आले नाहीत.

अमिताभ नाही घेऊ शकले चाहत्यांची भेट
author img

By

Published : May 6, 2019, 12:36 PM IST

मुंबई - बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन सोशल मीडियावर नेहमीच सक्रीय असतात. अमिताभला लाखो चाहते सोशल मीडियावर फॉलो करतात. या सर्व चाहत्यांचं मन अमिताभ कधीही दुखवत नाहीत. म्हणूनच दर रविवारी जलसाच्या बाहेर येऊन ते आपल्या चाहत्यांची भेट घेतात.

प्रत्येक रविवारी ते यासाठीचा वेळ निश्चित करत असतात. मात्र, या रविवारी त्यांच्या चाहत्यांची निराशा झाली. कारण, अमिताभ चाहत्यांना भेटण्यासाठी जलसाबाहेर आले नाहीत. यानंतर अमिताभ यांनी स्वतः ट्विट करत यामागचे कारण सांगितले आहे. या रविवारी घराबाहेर न पडण्याचे कारण अमिताभ यांची तब्येत आहे.

तब्येत ठीक नसल्याने या रविवारी चाहत्यांची भेट घेण्यासाठी बाहेर येऊ शकलो नाही, असे सांगत चिंतेची काहीही गोष्ट नसल्याचे अमिताभ यांनी म्हटले आहे. ७६ वर्षांचे अमिताभ गेल्या ३६ वर्षांपासून दर रविवारी आपल्या चाहत्यांना भेटण्यासाठी जलसाच्या बाहेर येतात. या दिवशी त्यांच्या घराबाहेर चाहत्यांची एकच गर्दी जमलेली असते.

Intro:Body:Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.