ETV Bharat / sitara

अल्लू अर्जुनच्या चाहत्यांसाठी खूशखबर, हिंदी भाषेतील 'पुष्पा' झळकणार ओटीटीवर

author img

By

Published : Jan 10, 2022, 7:42 PM IST

अल्लू अर्जुनच्या हिंदी भाषेतील चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. 250 कोटींहून अधिक कमाई केलेला पुष्पा आता हिंदीत प्रदर्शित होणार आहे. केव्हा आणि कुठे हे जाणून घेण्यासाठी वाचा...

ओटीटीवर हिंदी भाषेतील पुष्पा
ओटीटीवर हिंदी भाषेतील पुष्पा

हैदराबाद : साऊथचा सुपरस्टार अल्लू अर्जुनच्या हिंदी बेल्टच्या चाहत्यांसाठी मोठी बातमी समोर आली आहे. खरं तर, कोरोनाच्या काळातही 250 कोटींहून अधिक कमाई करणारा ब्लॉकबस्टर चित्रपट 'पुष्पा-द राइज-पार्ट-1' आता हिंदीत ओटीटीवर प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाचा दक्षिण भारतीय भाषातील प्रीमियर 7 जानेवारी रोजी प्राइम व्हिडिओवर झाला. हा चित्रपट गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये तेलुगू, तमिळ, मल्याळम आणि कन्नड भाषांमध्ये प्रदर्शित झाला होता.

हा चित्रपट लाल चंदनाच्या तस्करीवर आधारित आहे. या चित्रपटाद्वारे फहद फासिलने तेलुगू चित्रपटसृष्टीत पदार्पण केले. 'पुष्पा-द राइज-पार्ट-1' हा चित्रपट 14 जानेवारीला Amazon Prime Video वर हिंदीमध्ये स्ट्रिम होणार आहे. या घोषणेनंतर हिंदी प्रेक्षकांची अनेक आठवड्यापासूनची प्रतीक्षा संपणार आहे.

अल्लू अर्जुनने चित्रपटातील त्याच्या व्यक्तिरेखेबद्दल खुलासा केला, अभिनेता म्हणाला, "मी स्क्रिप्ट वाचली तेव्हा मला ती खूप आवडली होती. एखाद्या अनोळख्या बलशाली होण्याची कथा ऐकताना थोडी विचीत्र वाटू शकते, परंतु ज्याप्रकारे त्याचा प्रवास चित्रपटात दाखवला आहे त्याला तोड नाही. या व्यक्तिरेखेत अनेक स्तर आणि बारकावे गुंतलेले आहेत, मी माझ्या कारकिर्दीत अशी भूमिका कधीच केली नाही, या चित्रपटाचा एक भाग होण्याने मला विशेष अभिमान वाटतो आणि हा चित्रपट प्राइम व्हिडिओवर जगभरात प्रदर्शित होणार आहे याचा मला आनंद वाटतो.''

'पुष्पा' चित्रपटाची मुख्य अभिनेत्री रश्मिका मंदान्ना हिने देखील चित्रपटाशी संबंधित आपला अनुभव शेअर करताना सांगितले की, 'जेव्हा प्रेक्षकांनी चित्रपटाचे खूप कौतुक केले, तेव्हा अनेक महिन्यांच्या मेहनतीचे आणि प्रशिक्षणाचे फळ मिळाले, अल्लू अर्जुन आणि फहाद फासिल यांसारख्या अभिनेत्यांसोबत काम करणे माझ्यासाठी खूप खास आहे.

या चित्रपटाच्या अखेरीस इन्स्पेक्टरच्या भूमिकेत दिसलेला फहद फासिल म्हणाला, ''पुष्पा चित्रपटातून माझे तेलुगू चित्रपटसृष्टीत पदार्पण झाले आहे, चित्रपटाच्या कथेत प्रत्येक घटक विणला गेला आहे. मला अशा भूमिकांसाठी तयारी करायला आवडते.''

हेही वाचा - Viral Alert! रश्मिका मंदान्ना, विजय देवरकोंडा यांचा गोवा सुट्टीतील ऑनलाइन व्हिडिओ

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.