मुंबई - जॉन अब्राहम, दिशा पाटनी, अर्जुन कपूर आणि तारा सुतारिया यांची मुख्य भूमिका असलेल्या 'एक व्हिलन रिटर्न्स' चित्रपटाचे शुटिंग मुंबईत सुरू झाले आहे. दिशा आणि चित्रपटाच्या निर्मात्यांनी शुटिंग सुरू झाल्याचे घोषणा केली आहे.
दिशाने इंस्टाग्रामवर एक फोटो पोस्ट केला. फोटोमध्ये तिची पाठ कॅमेराकडे असून ती काळ्या रंगाचे जॅकेट परिधान केलेली दिसत आहे . तिच्या पाठीवर लिहिलंय, "एक व्हिलन रिटर्न्स."
त्यानंतर तिचा कथित बॉय फ्रेंड टायगर श्रॉफचीही प्रतिक्रिया तिला मिळाली. त्याने उत्तर देताना लिहिलंय, "ऑल द बेस्ट व्हिलन".
हा चित्रपट २०१४ च्या 'एक व्हिलन ' चित्रपटाचा सिक्वल आहे ज्यामध्ये सिद्धार्थ मल्होत्रा, श्रद्धा कपूर आणि रितेश देशमुख होते.
'एक व्हिलन २' साठी अभिनेत्री दिशा पाटनी पुन्हा एकदा 'मलंग' दिग्दर्शक मोहित सूरीबरोबर एकत्र येणार आहे. ''एक व्हिलन २' व्यतिरिक्त सलमान खानसोबत 'राधेः युवर मोस्ट वॉन्टेड भाई' मध्येही पाटनी दिसणार आहे. प्रभू देवा दिग्दर्शित या चित्रपटात रणदीप हूडा आणि जॅकी श्रॉफ देखील आहेत.
हेही वाचा - गोल्डन ग्लोब २०२१ : नॉर्मन लियर यांना कॅरोल बर्नेट पुरस्कार