ETV Bharat / sitara

आलिया-रणबीर 'ब्रह्मास्त्र'च्या शुटिंगसाठी वाराणसीत दाखल, शूटमधील व्हिडिओ लीक - रणबीरचा आगामी चित्रपट ब्रम्हास्त्र

आलिया भट्ट आणि रणबीर कपूर त्यांच्या 'ब्रह्मास्त्र' चित्रपटाच्या शेवटच्या शेड्यूलच्या शूटिंगसाठी उत्तर प्रदेशातील वाराणसीमध्ये दाखल झाले आहेत. अयान मुखर्जी दिग्दर्शित ब्रह्मास्त्र गेल्या सात वर्षांपासून तयार होत आहे. 9 सप्टेंबर रोजी हा चित्रपट चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे.

आलिया रणबीर ब्रह्मास्त्रच्या शुटिंगसाठी वाराणसीत

author img

By

Published : Mar 23, 2022, 11:49 AM IST

वाराणसी (उत्तर प्रदेश) - लव्ह बर्ड आलिया भट्ट आणि रणबीर कपूर 'ब्रह्मास्त्र'चे अंतिम शेड्यूल पूर्ण करण्यासाठी सध्या वाराणसीमध्ये पोहोचले आहेत. शूटिंगच्या ठिकाणाहून या जोडप्याचे अनेक फोटो ऑनलाइन समोर आले आहेत. एका फोटोमध्ये आलिया, रणबीर आणि चित्रपट निर्माता अयान मुखर्जी वाराणसीच्या एका घाटावर शूटिंग करताना दिसत आहेत. व्हायरल व्हिडिओ आणि फोटोमध्ये आलिया आणि रणबीर अनुक्रमे पिवळ्या आणि केशरी रंगाच्या पोशाखात दिसत आहेत.

रणबीर आणि आलिया सोमवारी मुंबई विमानतळावर स्पॉट झाले होते. त्यानंतर हे जोडपे सुट्टीवर जात असल्याचा अंदाज चाहते लावत होते. तथापि, हे दोघे 'ब्रह्मास्त्र'च्या शूटिंगच्या शेवटच्या टप्प्यासाठी वाराणसीला रवाना झाल्याचे निष्पन्न झाले. गेल्या सात वर्षांपासून या चित्रपटाची निर्मिती सुरू आहे. डिसेंबर २०२१ मध्ये रणबीर कपूरच्या 'शिवा'चा लूक प्रदर्शित केल्यानंतर, दिग्दर्शक अयान मुखर्जी आणि 'ब्रह्मास्त्र'च्या टीमने १५ मार्च रोजी आलियाच्या वाढदिवसानिमित्त तिच्या व्यक्तीरेखेचे पोस्टर रिलीज करुन चाहत्यांना आणि प्रेक्षकांना आश्चर्यचकित केले होते. निर्मात्यांनी आलियाच्या वाढदिवसानिमित्त एक खास झलक देणारे अगदी नवीन रोमांचक चित्रपटातील फुटेज देखील जारी केले होते.

आलिया रणबीर ब्रह्मास्त्रच्या शुटिंगसाठी वाराणसीत
आलिया रणबीर ब्रह्मास्त्रच्या शुटिंगसाठी वाराणसीत

फॉक्स स्टार स्टुडिओ, धर्मा प्रॉडक्शन, प्राइम फोकस आणि स्टारलाईट पिक्चर्स निर्मित अयान मुखर्जी दिग्दर्शित हा चित्रपट 9 सप्टेंबर रोजी हिंदी, तमिळ, तेलगू, मल्याळम आणि कन्नड या 5 भारतीय भाषांमध्ये थिएटरमध्ये प्रदर्शित होईल. यात अमिताभ बच्चन, रणबीर कपूर, आलिया भट्ट, मौनी रॉय आणि नागार्जुन अक्किनेनी यासारख्या उत्कृष्ट कलाकारांचा समावेश आहे.

हेही वाचा - Kangana Birthday : 35 व्या वाढदिवशी कंगना रणौतने वैष्णोदेवीचे घेतले दर्शन

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.