मुंबई - कोरोनाची बाधा झालेली अभिनेत्री आलिया भट्ट या आजारातून सावरली आहे. २ एप्रिल रोजी तिची कोविड टेस्ट पॉझिटिव्ह आली होती. त्यानंतर ती होम क्वारंटाईनमध्ये राहात होती.
आपली कोविड टेस्ट निगेटीव्ह आल्याची बातमी आलिया भट्टने दिली आहे. आपल्या इन्स्टाग्रामवर पोस्ट लिहून तिने ही बातमी दिली आहे. आपल्या पोस्टमध्ये तिने लिहिलंय, "ही एकमेव वेळ आहे जेव्हा निगेटीव्ह असणे हे चांगले असते."
- " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">
आलियाची २ एप्रिलला कोरोना व्हायरससाठीची चाचणी पॉझिटिव्ह आली होती. ती संजय लीला भन्साळी यांच्या गंगूबाई काठियावाडीच्या शुटिंगमध्ये बिझी होती. त्याच दरम्यान तिचा कथित बॉयफ्रेंड रणबीर कपूरलाही कोरोनाची लागण झाली होती.
हेही वाचा - आलिया भट्टचा ‘आरआरआर’ चित्रपटातील ‘सीता’ लूक आला समोर