मुंबई - सलमान आणि कॅटरिना कैफची जोडी पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येण्यास सज्ज झाली आहे. 'भारत' चित्रपटात हे कपल स्क्रीन शेअर करताना दिसणार आहे. काही दिवसांपूर्वीच चित्रपटातील मिठी मिठी 'चसनी' गाणं प्रदर्शित झालं आहे. ज्यात प्रेक्षकांना सलमान आणि कॅटची रोमँटिक केमिस्ट्री पाहायला मिळाली.
आता याच गाण्याचा मेकींग व्हिडिओ दिग्दर्शक अली अब्बास जफर यांनी आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवरून शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये कोरिओग्राफर चित्रपटाच्या टीमला सुचना देताना दिसत आहे. तर सलमान आणि कॅटरिना लाईटच्या झगमगाटात हे गाणं शूट करताना दिसत आहेत.
विशाल ददलानी आणि शेखर यांनी या गाण्याचे संगीत दिग्दर्शन केले आहे. चित्रपटात कॅटरिना आणि सलमानशिवाय सुनील ग्रोवर, नोरा फतेही, दिशा पटानी आणि तब्बू यांच्याही महत्त्वाच्या भूमिका आहेत. येत्या ५ जूनला ईदच्या दिवशी हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.