ETV Bharat / sitara

'हाऊसफुल्ल ४'च्या पोस्टरसाठी अक्षयचे चाहते आतुर, ट्विटवर करतायेत 'ही' मागणी

author img

By

Published : Sep 16, 2019, 3:05 PM IST

ट्विटरवर सध्या अक्षयच्या चाहत्यांनी या सिनेमाच्या पोस्टरसाठीचा तगदा लावला आहे. काहींनी मजेशीर मीम्स शेअर करत हे पोस्टर लवकर प्रदर्शित करावं, अशी मागणी अक्षयकडे केली आहे.

'हाऊसफुल्ल ४'च्या पोस्टरसाठी अक्षयचे चाहते आतुर

मुंबई - काही दिवसांपूर्वीच 'हाऊसफुल्ल ४' चित्रपटाची अधिकृत घोषणा करण्यात आली. यासोबतच चित्रपटाच्या स्टारकास्टवरूनही पडदा उठवण्यात आला होता. अक्षय कुमार, रितेश देशमुख, बॉबी देओल, क्रिती सॅनॉन, पूजा हेगडे अशी एकापेक्षा एक तगडी स्टारकास्ट असलेला हाऊसफुल ४ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. अशात आता प्रेक्षक या सिनेमाची आतुरतेने वाट पाहात आहेत.

ट्विटरवर सध्या अक्षयच्या चाहत्यांनी या सिनेमाच्या पोस्टरसाठीचा तगदा लावला आहे. काहींनी मजेशीर मीम्स शेअर करत हे पोस्टर लवकर प्रदर्शित करावं, अशी मागणी अक्षयकडे केली आहे. हा सिनेमा दिवाळीत प्रेक्षकांच्या भेटीला येणार असून चित्रपटाच्या प्रदर्शनाला अद्याप ४० हून अधिक दिवस बाकी आहेत. WE WANT HOUSEFULL ४ POSTER हा हॅश्टॅग सध्या ट्विटरवर ट्रेंड होत आहे.

दरम्यान फरहाद सामजी या चित्रपटाचे दिग्दर्शन करणार आहेत. तर साजिद नादियाडवाला यांची निर्मिती असणार आहे. १८० कोटींचं बजेट असणारा हा चित्रपट येत्या दिवाळीत प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

Intro:Body:Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.