ETV Bharat / sitara

अक्षय कुमारच्या 'बच्चन पांडे'चे जानेवारीत होणार शूटिंग - Akshay Kumar latest news

अक्षय कुमारची प्रमुख भूमिका असलेल्या साजिद नाडियाडवाला यांच्या 'बच्चन पांडे' चित्रपटाचे शूटिंग जानेवारीपासून सुरू आहे. अक्षय अभिनेत्री कृती सेनन, दिग्दर्शक फरहाद समाजी आणि युनिटच्या इतर सदस्यांसह २ महिन्यांच्या मॅरेथॉन शेड्युलसाठी जैसलमेरला जाणार आहे.

Bachchan Pandey
बच्चन पांडे
author img

By

Published : Nov 4, 2020, 5:52 PM IST

मुंबई - साजिद नाडियाडवाला यांच्या 'बच्चन पांडे' चित्रपटाचे शूटिंग जानेवारीपासून सुरू आहे. अक्षय कुमारची प्रमुख भूमिका असलेल्या या चित्रपटाचे शूटिंग मार्चपर्यंत सुरू राहील. साजिद नाडियाडवाला यांच्यासोबतचा अक्षयचा हा १०वा चित्रपट असेल.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अक्षय अभिनेत्री कृती सेनन, दिग्दर्शक फरहाद समाजी आणि युनिटच्या इतर सदस्यांसह २ महिन्यांच्या मॅरेथॉन शेड्युलसाठी जैसलमेरला जाणार आहे. यादरम्यान ते वास्तव लोकेशन्सवर शूटिंग करणार आहेत. प्रॉडक्शन टीमने सर्व आवश्यक परवानग्या घेतल्या आहेत आणि सर्व सरकारी मार्गदर्शक तत्त्वे विचारात घेतले आहेत. शूटिंगची जागा निश्चित केली गेली आहे."

अक्षय, साजिद, कृती आणि फरहाद यापूर्वी २०१९च्या पीरियड-कॉमेडी हाऊसफुल 4मध्ये एकत्र दिसले होते. या चित्रपटाचे अनेक क्रू सदस्य 'बच्चन पांडे'मध्येही सामील होतील, अशी माहिती सूत्रांनी दिली.

संपूर्ण टीम सूर्यगढ़ हॉटेलमध्ये एकत्र थांबेल आणि तेथे काही इनडोअर सीन चित्रीत केले जातील. या चित्रपटामध्ये काही अॅक्शन सीन्सही आहेत.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.