मुंबई - अभिनेता अक्षय कुमार लवकरच त्याच्या आगामी ‘राम सेतू’ चित्रपटाच्या मुहूर्ताच्या शुटिंगसाठी अयोध्येला जाणार आहे. चित्रपटाचे दिग्दर्शक अभिषेक शर्मा आणि सर्जनशील निर्माता डॉ. चंद्रप्रकाश द्विवेदी यांच्यासमवेत अक्षय १८ मार्चला आयोध्येत पोहोचणार आहे. अयोध्येत चित्रपटाचा मुहूर्त करण्याची संकल्पना द्विवेदी यांचीच आहे.
"राम सेतू'च्या प्रवासाला सुरुवात श्रीरामांच्या जन्मभूमीपासून व्हावी असे मला वाटते होते. मी अनेकवेळा अयोध्येला भेट दिल्यानंतर अक्षय आणि टीमला सुचवले की शुटिंगचा मुहूर्त इथून करावा. श्रीराम मंदिरात जाऊन स्रवांनी आशीर्वाद घ्यावा. त्या प्रमाणे आम्हा अयोध्येतून मुहूर्त करणार आहोत,'' असे द्विवेदी यांनी सांगितले.
कोरोनाचे सर्व नियम पाळून हे शुटिंग सुरू होणार आहे. राम सेतु या चित्रपटात अक्षय शिवाय जॅकलिन फर्नांडिज आणि नुशरत भरुचा या अभिनेत्रींच्या प्रमुख भूमिका आहेत.
हेही वाचा - ‘मिस वर्ल्ड’ भारतीय हॉलिवूड स्टार प्रियांका चोप्रा जोनास अनेक गोष्टींमध्ये पारंगत