ETV Bharat / sitara

फक्त ट्विट करू नका, दान करा; पुरग्रस्तांच्या मदतीसाठी अक्षयचं आवाहन - donate

या संपूर्ण घटनेवर केवळ प्रतिक्रिया देत दुःख व्यक्त करावं, असं मला वाटत नाही. मी सर्वांना अशी विनंती करेल, की ट्विट करण्याऐवजी शक्य ती मदत करत पुरग्रस्तांसाठी दान करा, असं अक्षय म्हणाला.

पुरग्रस्तांच्या मदतीसाठी अक्षयचं आवाहन
author img

By

Published : Jul 19, 2019, 5:55 PM IST

मुंबई - सध्या आसाम आणि बिहारसारख्या राज्यांमध्ये पुराने कहर केला आहे. यात अनेक नागरिकांचा मृत्यू झाला आहे. तर काझीरंगा अभयारण्याचा ९० टक्क्याहून अधिक भाग पाण्याखाली गेला आहे. ही परिस्थिती मन हेलावणारी आहे. आसाममध्ये आलेल्या पुराचा परिणाम तेथील नागरिकांवर आणि प्राण्यांवर होत आहे.

अनेकजण पुरग्रस्तांसाठी मदत निधी देत आहेत, तर काहींनी ट्विट करत याबद्दल हळहळ व्यक्त केली आहे. यावर आता बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमारची प्रतिक्रिया आली आहे. या संपूर्ण घटनेवर केवळ प्रतिक्रिया देत दुःख व्यक्त करावं, असं मला वाटत नाही. मी सर्वांना अशी विनंती करेल, की ट्विट करण्याऐवजी शक्य ती मदत करत पुरग्रस्तांसाठी दान करा, असं अक्षय म्हणाला.

भारताच्या मंगळ मोहिमेवर आधारित मिशन मंगल चित्रपटाच्या ट्रेलर लॉन्च इव्हेंटदरम्यान तो बोलत होता. दरम्यान अक्षयने कांझीरंगा अभायारण्य आणि आसामच्या मुख्यमंत्री मदत निधीसाठी प्रत्येकी १ कोटी रूपये दान केले आहेत. यानंतर आता अक्षयने इतरांनाही मदतीचं आवाहन केलं आहे.

Intro:Body:Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.