ETV Bharat / sitara

Bollywood Year Ender 2021 : सलमान-रणवीरला मागे टाकत अक्षय बनला बॉक्स ऑफिसचा 'BOSS'

2021 हे वर्ष बॉलीवूडसाठी खास नव्हते. या वर्षी फक्त काही चित्रपट थिएटरमध्ये प्रदर्शित झाले आणि तेही बॉक्स ऑफिसवर आपटले. यापैकी अक्षय कुमारच्या एका चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर भरपूर कमाई केली.

author img

By

Published : Dec 30, 2021, 3:07 PM IST

बॉक्स ऑफिस 2021
बॉक्स ऑफिस 2021

मुंबई - कोविड-19 जागतिक महामारीमुळे 2021 मध्येही बॉलिवूडला समस्यांचा सामना करावा लागला. यावर्षी फक्त एकच चित्रपट बॉक्स ऑफिसवर टक्कर देऊ शकला. सिनेमा हॉल बंद झाल्यामुळे बहुतेक चित्रपट 'ओव्हर द टॉप' (OTT) प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होऊ शकले. तर काही चित्रपट मोठ्या पडद्यावर प्रदर्शित झाले, परंतु ते बॉक्स ऑफिसवर पैसे जमा करू शकले नाहीत.

बॉक्स ऑफिस 2021
बॉक्स ऑफिस 2021

दिग्दर्शक कबीर खानचा बहुप्रतिक्षित चित्रपट '83' वर्षभराच्या प्रदीर्घ प्रतिक्षेनंतर ख्रिसमसच्या पूर्वसंध्येला सिनेमागृहात प्रदर्शित झाला. परंतु चित्रपटाचे समीक्षकांचे कौतुक होऊनही तो बॉक्स ऑफिसवर फार काही कमाल दाखवू शकला नाही. याचे कारण कोरोना विषाणू असल्याचे मानले जात आहे, कारण देशभरात अनेक ठिकाणी सिनेमागृहे बंद आहेत.

चित्रपट 83

बॉक्स ऑफिस 2021
बॉक्स ऑफिस 2021

ज्येष्ठ वितरक आणि प्रदर्शक ( Distributor and Exhibitor ) राज बन्सल यांच्या मते, '83' चित्रपटाने तीन दिवसांत केवळ 47 कोटी रुपयांची कमाई केली. ही कमाई अपेक्षेपेक्षा खूपच कमी आहे. राज बन्सल म्हणाले, '83' चित्रपटाने खूपच निराशाजनक कमाई केली. या वर्षी बॉक्स ऑफिसवर सर्वाधिक कमाई करणारा हा चित्रपट असेल अशा प्रकारे अंदाज केला होता, परंतु तसे झाले नाही. कमाई अजिबात अपेक्षेप्रमाणे झाली नाही'.

सूर्यवंशी

बॉक्स ऑफिस 2021
बॉक्स ऑफिस 2021

या वर्षी बॉलीवूडमधील फक्त एकच चित्रपट मोठ्या पडद्यावर चांगली कमाई करू शकला आणि लॉकडाऊनमुळे आठ महिन्यांहून अधिक काळ बंद असलेल्या सिनेमागृहांमध्ये प्रेक्षक मिळवण्यात यशस्वी झाला. अक्षय कुमारची मुख्य भूमिका असलेला 'सूर्यवंशी' हा तो चित्रपट होता.

रोहित शेट्टी दिग्दर्शित दिवाळीच्या मुहूर्तावर तीन हजारांहून अधिक स्क्रीनवर प्रदर्शित झाला. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर 2021 चा एकमेव मोठा हिट ठरला. या चित्रपटाने भारतात 195 कोटी रुपयांची कमाई केली.

या वर्षाच्या सुरुवातीला ऋचा चढ्ढाची प्रमुख भूमिका असलेला 'मॅडम चीफ मिनिस्टर', त्यानंतर मार्चमध्ये 'रुही' आणि 'मुंबई सागा' मोठ्या पडद्यावर प्रदर्शित झाले. या चित्रपटांनी मिळून भारतात 40 कोटींहून अधिक कमाई केली. यामुळे फिल्म इंडस्ट्रीला एक आशेचा किरण मिळाला. परंतु एप्रिल-मेमध्ये कोविड-19 च्या दुसऱ्या लाटेच्या उद्रेकामुळे परिस्थिती आणखी बिकट झाली.

अंतिम : द फाइनल ट्रुथ

बॉक्स ऑफिस 2021
बॉक्स ऑफिस 2021

अक्षय कुमारचा 'बेल बॉटम' हा चित्रपट जुलै-ऑगस्टमध्ये मोठ्या पडद्यावर प्रदर्शित झाला होता जेव्हा कोरोना संसर्गाची प्रकरणे कमी होती, या चित्रपटाने 35 कोटींची कमाई केली होती. सूत्रांनुसार, ही कमाई चित्रपटासाठी पुरेशी होती. कारण त्यावेळी महाराष्ट्रातील चित्रपटगृहे बंद होती. यानंतर 'सूर्यवंशी' आणि '83' या चित्रपटांकडून अपेक्षा होत्या. सलमान खानची भूमिका असलेल्या 'अंतिम' या चित्रपटाने 38 कोटींचा व्यवसाय केला.

चंडीगढ़ करे आशिकी

बॉक्स ऑफिस 2021
बॉक्स ऑफिस 2021

आयुष्मान खुरानाचा 'चंदीगढ करे आशिकी' अजूनही चित्रपटगृहांमध्ये चालू आहे आणि सुमारे 25 कोटी रुपयांची कमाई अपेक्षित आहे. बिहारचे प्रदर्शक विशेक चौहान म्हणाले, 'हे सांगण्याचा दुसरा कोणताही मार्ग नाही, पण यंदाचे वर्ष हे फिल्म इंडस्ट्रीसाठी निराशाजनक राहिले आहे. वर्षभरात फक्त 'सूर्यवंशी'ने चांगली कमाई केली आहे, बाकी सर्व चित्रपट 40 कोटींपेक्षा कमी कमाई करू शकले आहेत.

हेही वाचा - सनी लिओनीच्या मधुबनसह यंदा सर्वाधिक लोकप्रिय ठरलेली गाणी

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.