मुंबई - कोरोना व्हायरसमुळे सुरू असलेल्या लॉकडाऊनदरम्यान बॉलिवूड अभिनेता सोनू सूद देशातील विविध भागात अडकलेल्या प्रवासी मजुरांना घरी पोहोचवत आहे. सध्या सोनू सोशल मीडियावरही खूप सक्रिय आहे. सोशल मीडियावरून मदतीची अपेक्षा करणाऱ्यांसाठी सोनू मदतीचे आश्वासन देताना दिसत आहे.
-
The sensitive nature of the work that you are doing with sending migrant workers back to their homes safely is exemplary. More strength to you, Sonu 🙏@SonuSood #IndiaFightsCorona #StayHomeStaySafe
— Ajay Devgn (@ajaydevgn) May 26, 2020 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">The sensitive nature of the work that you are doing with sending migrant workers back to their homes safely is exemplary. More strength to you, Sonu 🙏@SonuSood #IndiaFightsCorona #StayHomeStaySafe
— Ajay Devgn (@ajaydevgn) May 26, 2020The sensitive nature of the work that you are doing with sending migrant workers back to their homes safely is exemplary. More strength to you, Sonu 🙏@SonuSood #IndiaFightsCorona #StayHomeStaySafe
— Ajay Devgn (@ajaydevgn) May 26, 2020
अभिनेता अजय देवगणनेही सोशल मीडियाच्या माध्यमातून सोनूचे कौतुक केले आहे. अजय यांनी लिहिले, की सोनूचे स्थलांतरित मजुरांना त्यांच्या घरी सुखरुप नेण्याचे काम कौतुकास्पद आहे. अजयच्या या पोस्टवर सर्व सोशल मीडिया युजर्सही सोनूचे कौतुक करीत आहेत. अजयने ट्वीटमध्ये लिहिले आहे, ''परप्रांतीय मजुरांना सुखरुप घरी नेण्याचे काम अनुकरणीय आहे. सोनू, तुला खूप शक्ती मिळूदे.''
अजय देवगनच्या या पोस्टच्या कमेंट बॉक्समध्ये एका युजरने लिहिले आहे, 'लॉकडाऊन दरम्यान सोनू हा खरा दबंग आहे. संपूर्ण भारताला तुमचा अभिमान वाटतो.' दुसऱ्याने लिहिलंय की, ''सोनूसर सिंघमचे काम करीत आहे.''
आजकाल लॉकडाऊनमुळे विस्थापित होऊन स्थलांतरित कामगार पायीच त्यांच्या गावी जात आहेत. ज्यामध्ये त्यांना बर्याच अडचणींचा सामना करावा लागत आहे. यासाठी सोनूने मुंबईहून आपल्या गावी परतणाऱ्या कामगारांसाठी बसेसची व्यवस्था केली आहे. त्याच्या या अविरत कामाची दखल सोशल मीडियासह इतर माध्यमानेही घेतली आहे.