'उरी' चित्रपटाला मिळालेल्या उत्तम यशानंतर आता आणखी एक युध्दपट येत आहे. १९७१ च्या भारत पाक युध्दाची कथा पडद्यावर साकारली जाणार आहे. 'भूज द प्राईड ऑफ इंडिया' असे या चित्रपटाचे शीर्षक असेल.
७१ च्या भारत पाक युध्दात स्क्वाड्रन लिडर विजय कर्णिक यांच्याकडे भूज विमानतळाचा चार्ज होता. त्यांच्या पराक्रमाची कथा या चित्रपटात पाहायला मिळेल. त्यांची व्यक्तीरेखा अजय देवगण साकारणार आहे.
अभिषेक दुधाइया 'भूज द प्राईड ऑफ इंडिया' या चित्रपटाचे दिग्दर्शक असतील. गिन्नी कनोजिया, वजीर सिंग, भूषण कुमार, कृषण कुमार आणि अभिषेक दुधाइया याचे निर्माते आहेत.
एस एस राजमोली यांच्या आगामी 'आरआरआ'र चित्रपटात अजय देवगण भूमिका साकारत असल्याची बातमी ताजी असताना त्यांच्या चाहत्यांसाठी ही नवी आनंदाची बातमी आहे.