मुंबई - दर वर्षी 13 हा दिवस जागतिक अवयव दान दिवस(World Organ Donation Day 2021) म्हणून साजरा केला जातो. अवयव दानाबद्दल जागरुकता निर्माण करणे हा याचा मुख्य उद्देश आहे. अवयव दानाची हे महान दानाच्या श्रेणीत गणना केली जाते. अंगदानाच्या या श्रृंखलेमध्ये बॉलिवूडचे काही स्टार्स सहभागी आहेत. कोरोना प्रभावामुळे ही संख्या थोडी कमी झाली आहे, परंतु आपण चर्चा करणार आहोत ज्यांनी आपल्या अवयव दानाची घोषणा केली आहे त्यांच्याबद्दल. यात एक अभिनेता असा आहे ज्याने आपल्या शरीराचे बहुतेक सर्व अवयव दान करण्याचा निर्णय केलाय.
सलमान खान
- " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">
बॉलिवूडचा भाईजान सलमान खानने शरीरातील बोन मॅरो (Bone Marrow) अवयव दान करायचे ठरवले आहे. अवयव दान हे महान दान असल्याचे सांगत आपल्या चाहत्यांना सलमानने उत्साहित केले आहे.
प्रियंका चोप्रा
- " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">
बॉलिवूडची देसी गर्ल आता आंतरराष्ट्रीय व्यक्तीमत्व बनली आहे. अवयव दानाच्या बाबतीत प्रियंका मागे नाही. प्रियंकाने आपल्या शरीरातील अवयव दानाची घोषणा केली आहे ज्यात किडनीचाही समावेश आहे.
अमिताभ बच्चन
- " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">
बॉलिवूडचे महानायक या बाबतीत मागे कसे राहतील. बिग बी यांनीही अवयव दानाची घोषणा केली आहे. त्यांनी आपले डोळे दान करण्याची घोषणा केली आहे.
राणी मुखर्जी
बॉलिवूडच्या या प्रसिध्द अभिनेत्रीने आपले सुंदर डोळे दान करण्याचा निर्णय घेतला आहे.
आमिर खान
अवयव दान करणाऱ्या बॉलिवूड स्टार्सच्या यादीत आमिर खानचेही नाव आहे. 2014 मध्ये अवयव दानाच्या दिवशी आमिर खानने किडनी, लिव्हर, डोळे, कातडी, आंतडी, फुफ्फुस, ह्रदय, पँक्रियाज, इअर ड्रम्ज आणि सर्व उपयोगी अवयव दान करण्याचा निर्णय जाहीर केला होता.
ऐश्वर्या राय
- " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">
'बिग बी' यांची सून ऐश्वर्या राय बच्चन हिनेही अवयव दान करण्याचा निर्णय जाहीर केलाय. ती आपले सुंदर डोळे दान करणार आहे.
हेही वाचा - मुंबईत डेल्टाप्लस रुग्णाचा मृत्यू; दोनदा लस घेतल्यानंतरही अंत