मुंबई - बॉलिवूड अभिनेत्री करिना कपूर हिने सोमवारी हिमाचल प्रदेशचा निरोप घेतला. सैफ इथे एका चित्रपटाच्या शूटिंगसाठी आला होता. करिना पती सैफ अली खानबरोबर येथे थांबली होती. करिनाने तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर पोस्टमध्ये लिहिलंय, "बाय-बाय पालमपूर. मस्त अनुभव होता, हॅलो मुंबई, मी घरी येत आहे."
करीना सैफबरोबर हिमाचल प्रदेशात गेली होती. अभिनेता आपल्या आगामी ‘भूत पोलिस’ चित्रपटाचे शूटिंग पहाडी शहरातील विविध ठिकाणी करत होता.
हेही वाचा - वरुण धवन म्हणतो, कोरोनाच्या बाबतीत मी अधिक सावध राहायला हवे होते
चित्रपटाच्या पहिल्या शेड्यूलचे शुटिंग ५ डिसेंबरला पहाडी शहरात झाले होते. त्याचबरोबर या चित्रपटाचे निर्माता १५ डिसेंबरपासून मुंबईत याचे दुसऱ्या शेड्यूलचे शुटिंग करणार आहेत.
पवन कृपलानी दिग्दर्शित या हॉरर कॉमेडी चित्रपटामध्ये सैफ अली खान व्यतिरिक्त जॅकलिन फर्नांडिस, यामी गौतम, अर्जुन कपूर आणि जावेद जाफरी यांच्या प्रमुख भूमिका आहेत.
हेही वाचा - अभिनेत्री जारा खानला बलात्काराची धमकी देणाऱ्या 'तरुणी'ला अटक