ETV Bharat / sitara

लंडनहून परतल्यावर आई-बाबांना भेटायला पुण्याला धावली राधिका आपटे ! - आई-बाबांना भेटायला पुण्याला धावली राधिका आपटे

दीर्घकाळानंतर भारतात परतलेली अभिनेत्री राधिका आपटे विलगीकरण संपताच पुण्याच्या दिशेने रवना झाली. आपल्या आई-बाबांना भेटण्यासाठी तिने पुणे गाठले. ती त्यांना एका वर्षांनी भेटत होती व ही हृद्य भेट तिला आनंद देऊन गेली.

राधिका आपटे
author img

By

Published : Feb 4, 2021, 3:29 PM IST

मुंबई - कोविड-१९ मुळे जगभरात अनेक देशांत लॉकडाऊन जाहीर झाला होता व आंतरराष्ट्रीय सीमा बंद करण्यात आल्या होत्या. त्यामुळे भारतात, मुंबईसकट, मोठ्या शहरांमध्ये रोजीरोटीसाठी आलेला कामगारवर्ग तिथेच अडकून पडला होता व त्यांचे कुटुंबीय गावांमध्ये चिंताग्रस्त झाले होते. अशीच काहीशी विचित्र परिस्थिती अनुभवली आपली मराठमोळी अभिनेत्री राधिका आपटेने. लॉकडाऊनच्या आधी शूटिंग निमित्त व सासरभेटीसाठी गेलेली राधिका विमानसेवा बंद झाल्यामुळे लंडनमधेच अडकून पडली होती. आता तब्बल दहाएक महिन्यांनी तिने मुंबईचे तोंड पाहिले.

लंडनहून परत आल्यावर राधिका आपटेने शासकीय नियमांद्वारे आधी स्वतःला विलगीकरणात ठेवले व तो काळ संपताच ती धावली पुण्याला, आपल्या आई-बाबांना भेटण्यासाठी. ती त्यांना एका वर्षांनी भेटत होती व ती हृद्य भेट तिला आनंद देऊन गेली. साहजिकच आहे, जेव्हा आपण आपल्या आप्तांना, आणि त्यातही आपल्या जन्मदात्यांना, वाटत असूनही भेटू शकत नाही तेव्हा मनाची घालमेल तर होणारच, जी राधिकाने अनुभवली होती. राधिकाच्या ही सर्वात मोठ्ठी व दीर्घ ‘सुट्टी’ होती.

राधिका आपटेने गेल्या वर्षी ‘रात अकेली हैं’ आणि ‘अ कॉल टू स्पाय’ या चित्रपटांतून उत्तम कामगिरी दर्शविली होती. आता ती एका नव्या चित्रपटात काम करीत असून त्या चित्रपटाच्या, ‘अंडरकव्हर’ च्या, चित्रीकरणासाठी ती लंडनमधून मुंबईत आली. सूत्रांनुसार, ‘राधिका लंडनहून १० महिन्यांनंतर ‘अंडरकव्हर’ च्या शूटसाठी मुंबईत आली व शासनाच्या सुरक्षा मार्गदर्शनानुसार तिने स्वत: ला विलगीकरणात ठेवले होते. तिच्या पुढच्या शूटिंगच्या अगोदर एका वर्षा नंतर तिने तिच्या आई-वडिलांची पुण्यात भेट घेतली.” स्त्रोत पुढे म्हणाले की, “लंडनमधील लॉकडाऊनमुळे ती आपल्या कुटूंबापासून दूर असल्याने तिच्या क्वारंटाईननंतर पुन्हा कामात व्यस्त होण्यापूर्वी, तिने पहिले काम केले ते म्हणजे, ती तिच्या आई-वडिलांना भेटायला पुण्याला गेली.”

राधिका आपटे ने आपल्या देशातील आगमनानंतर सर्व सरकारी सुरक्षा मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करून हॉटेलमध्ये स्वत: ला अलग केले होते. तिच्या फॅन्सची आता ‘अंडरकव्हर’ बद्दल उत्सुकता निर्माण झालीय, ज्याचे शूटिंग याच महिन्यात सुरु होणार आहे.

हेही वाचा - अभिनेत्री रश्मीका मंदनाचा ‘मिशन मजनू’ आहे सिद्धार्थ मल्होत्रा!

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.